breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

मिशन- २०२२ : प्रभाग रचनेतील तोडफोडीचा होणार पक्षांतरावर थेट परिणाम!

  • महाविकास आघाडीसह भाजपाला निवडणूक आयोगाचा धक्का
  • पुणे, पिंपरी-चिंचवडमधील इच्छुकांचा पुन्हा भ्रमनिरास

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या ३ सदस्यीय प्रभाग रचनेचा आराखडा दोन्ही महापालिकांच्या आयुक्तांनी निवडणूक आयोगासमोर सादर केला. मात्र, सोमवारी राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेची चिरफाड केली आहे. याचा थेट परिणाम संभाव्य पक्षांतरावर होणार आहे. त्यामुळे भाजपासह महाविकास आघाडीतील पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी आणखी वाढली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीतील प्रभाग रचना प्रक्रियेवर राज्यातील सत्ताधारी पक्षाचे प्रभाव राहतो, असे चित्र गेल्या अनेक वर्षांपासून पहायला मिळते. आता पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह राज्यातील १० मोठ्या महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणूका फेब्रुवारी २०२२ मध्ये नियोजित आहेत. त्यासाठी निवडणूक आयोग कामाला लागला आहे. परंतु, प्रभाग रचना करताना महापालिका प्रशासनावर राजकीय दबाव असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील विरोधी पक्ष भाजपा आणि महापालिकेतील विरोधी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मनासारखे प्रभागरचना करण्याबरोबरच कायदेशीर निकषांचे पालन करताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागली. याचे पडसाद राज्य निवडणूक आयोगासमोर झालेल्या सादरीकरणात दिसते, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांकडून मिळते.

राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही रचना करण्यात आली आहे. ६ डिसेंबरला पुणे महापालिका आयुक् विक्रमकुमार आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी ही प्रारुप प्रभागरचना आयोगाकडे सादर केली. राज्य निवडणूक आयोगाने या आराखड्याचे सादरीकण पाहिल्यानंतर ५० टक्क्यांहून अधिक ठिकाणी बदल सुचवले आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडून सुचवण्यात आलेल्या बदलांबाबतचे पत्र येत्या दोन दिवसांत महापालिका प्रशासनाला पाठवण्यात येणार आहे. त्यानुसार महापालिका प्रशासन प्रभाग रचनेच्या कच्च्या आराखड्यात बदल करीत आणि तो बदलेला आराखडा पुन्हा राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडून सुचविण्यात येणारे बदल महापालिकने तातडीने सादर केल्यास प्रभागरचनेचा प्रारूप कच्चा आराखडा १५ ते २० डिसेंबर दरम्यान हरकती-सूचनांसाठी प्रसिद्ध केला जाण्याची शक्यता आहे. ही सर्व प्रक्रिया वेळेत पार पडल्यास जानेवारी अखेरीपर्यंत प्रभागरचना आरक्षणासह जाहीर होवू शकते, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

दरम्यान, प्रभाग रचनेची चिरफाड होणार असल्याने भाजपासह महाविकास आघाडीतील नाराज नगरसेवकांचे पक्षांतर आणखी लाबणीवर पडणार आहे. विशेष म्हणजे, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपामध्ये नाराजांची संख्या जास्त असल्यामुळे पक्षांतराला होणारा विलंब महाविकास आघाडीसाठी नुकसाणकारक ठरताना दिसत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button