breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मिशन- २०२२ : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते पार्थ पवार ‘ऑन फिल्ड’

  • राष्ट्रवादीच्या नवोदित कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह
  • महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी आता ‘भाकरी फिरवणार’?

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते पार्थ अजित पवार आता ‘ऑन फिल्ड’ उतरले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीतील नवोदित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आता सत्तेची भाकरी फिरवणार का? अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

पार्थ पवार यांनी पिंपरीतील साई चौक येथील एका मोबाईल दुकानाचे शनिवारी उद्घाटन केले आहे. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते तथा विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसेवक डब्बू आसवानी, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, नगरसेविका निकिता कदम, माजी नगरसेवक गुरुबक्ष पेहेलानी आदी मान्यवर उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीनंतर (२०१९) पार्थ पवार यांनी सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडमधील सर्वसामान्य नागरिकांशी संपर्क कायम ठेवला आहे. कोरोना काळात पार्थ पवार सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून मोठे काम उभा केले आहे.

२०१७ मध्ये पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. मात्र, पार्थ यांना पराभवाचा समाना करावा लागला होता. दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार्थ पुन्हा एकदा सक्रिय झालेले पहायला मिळत आहेत.

व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन…

पिंपरी-चिंचवड महापालिकेत पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. चिंचवड आणि भोसरी मतदार संघामध्ये भाजपा आमदार आहेत. तर पिंपरी मतदार संघामध्ये राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे प्रतिनिधीत्व करीत आहेत. ज्या साई चौकामध्ये पार्थ पवार यांनी मोबाईल शोरुमचे उद्घाटन केले. त्या भागात मोठ्या प्रमाणात व्यापारी आहेत. व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींची पार्थ यांनी चर्चा केली. या समस्या सोडवण्याबाबत आश्वासानही दिले आहे. पिंपरी मतदार संघातून जास्तीत-जास्त नगरसेवक निवडून आणून भाजपाला शह देण्याची रणनिती राष्ट्रवादीकडून आखली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button