breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

मिशन- २०२२ : आमदार अण्णा बनसोडे नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा ‘गनिमी कावा’

  • पिंपरीतील जनसंपर्क कार्यालयात शहर पदाधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठक
  • शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, माजी आमदार विलास लांडे यांची उपस्थिती

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपाला घेरण्यासाठी आमदार अण्णा बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ‘गनिमी कावा’ केला आहे. बनसोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात गुरूवारी झालेल्या प्रमुख शिलेदारांच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी वज्रमूठ बांधल्याचे दिसले.

पिंपरी विधानसभा मतदार संघाचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीला शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर आझमभाई पानसरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर, माजी महापौर मंगला कदम, नगरसेविका माई काटे, नगरसेवक रोहितआप्पा काटे, माजी नगरसेवक जगदीश शेट्टी, प्रसाद शेट्टी, ॲड. संदीप चिंचवडे आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर आली आहे. राष्ट्रवादीचे ‘कारभारी’ उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शहरातील स्थानिक नेत्यांना एकजुटीने कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार निवडणूक मोर्चेबांधणी करण्यासाठी स्थानिक नेत्यांनी आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयात चर्चा केली. भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार, विकासकामांतील ढिसाळपणा आणि शहरात वाढलेले विद्रुपिकरण आदी विविध विषयांवर सत्ताधारी भाजपाला घेरण्याची रणनिती या बैठकीत आखण्यात आली.

पिंपरी विधानसभा ठरणार ‘किंगमेकर’

शहरातील भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये भाजपाचे आमदार आहेत. पिंपरी मतदार संघात राष्ट्रवादीचा ऐकमेव आमदार आहे. भोसरी आणि चिंचवडमध्ये भाजपा सर्व शक्तीनिशी मैदानात उतरणार आहे. मात्र, महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी पिंपरी विधानसभा ‘किंगमेकर’च्या भूमिकेत राहणार आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी ताकद तुलनेतने पिंपरीत जास्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सत्ता काबिज करण्यासाठी पिंपरी मतदार संघ पर्यायाने आमदार अण्णा बनसोडे यांची मोठी मदत होईल, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button