breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

उत्तर कोरियाकडून समुद्रातून पुन्हा क्षेपणास्त्राची चाचणी

सियोल – संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्बंधाकडे दुर्लक्ष करत उत्तर कोरियाने मंगळवारी पुन्हा एकदा समुद्रात एक बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली. याबाबत दक्षिण कोरिया आणि जपानच्या सैन्याने माहिती दिली. उत्तर कोरियाने प्रायद्वीपच्या पूर्वेकडील समुद्रात ही क्षेपणास्त्र चाचणी केली आहे.

यापूर्वी उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांनी सप्टेंबरमध्ये त्यांच्या नवीन क्षेपणास्त्रांची चाचणी केली होती. आता दोन्ही देशांच्या या चाचण्यांनंतर कोरियन द्वीपकल्पात शस्त्रास्त्रांची शर्यत सुरू झाली आहे, त्यामुळे संपूर्ण जगाला चिंता लागली असून उत्तर कोरियाने पुन्हा दक्षिण कोरियावर दबाव आणण्याची तयारी सुरू केली आहे. अमेरिकेने उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र धोरणावर, त्यांच्या रणनीतीवर पुन्हा एकदा विचार करण्यास सुरुवात केली आणि काही तासातच उत्तर कोरियाने समुद्रात क्षेपणास्त्र डागले. एका महिन्याच्या कालावधीनंतर उत्तर कोरियाने पुन्हा एकदा मिसाईलच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. जपानच्या तट रक्षक दलाने तत्काळ त्यांच्या जहाजांना समुद्राच्या सुरक्षेबाबत इशारा देत सज्ज राहण्यास सांगितले होते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button