ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दान घेतलेल्या गणेश मूर्तींचे विसर्जन करुन पालिकेकडून जनतेची दिशाभूल – प्रदीप नाईक

पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने दान घेतलेल्या 13 हजार 758 गणेश मूर्तींचे खाणीत विसर्जन केले. मग, या मूर्त्या दान केल्या असे म्हणता येईल का? असा सवाल करत महापालिकेकडून दान घेतलेल्या मृर्त्यांचे विसर्जन करुन जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केला.गणेशोत्सावापासून ते अनंत चतुर्थीपर्यंत विसर्जित झालेल्या मूर्तींची ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाकडील माहिती आणि दान केलेल्या मूर्तींची माहिती प्रदीप नाईक यांनी माहिती अधिकारात मागितली होती. त्यात 29 हजार 98 गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. तर, एकही मूर्ती दान झाली नसल्याची माहिती महापालिकेने नाईक यांना दिली आहे. त्याबाबत बोलताना नाईक म्हणाले, महापालिका प्रशासन नागरिकांकडून मूर्ती दान म्हणून स्वीकारत असल्याचे सांगते. मूर्तीचे विसर्जन करते आणि मूर्तीदान झाले नसल्याची माहिती दिली जाते. ही मोठी दिशाभूल आहे.

प्रशासनाने या मूर्ती दान केल्या असल्याचे दाखविले. पण, मूर्त्यांचे विसर्जन केले. नागरिकांनीच मूर्त्यांचे विसर्जन केले. तर, महापालिकेला काय अडचण आहे?. महापालिकेकडून मूर्त्या दान घेतल्याचे सांगितले, दाखविते जाते. प्रत्यक्षात दान केलेल्या मूर्त्या एका बंद पडलेल्या मीलमध्ये नेल्या जातात आणि तिथे मशीनद्वारे विसर्जित केल्या जातात. मूर्तीचे विधिवत विसर्जन केले जात नाही. मग, या मूर्त्या दान केल्या असे म्हणता येईल का?, महापालिकेकडून मूर्त्या दान घेतल्याचे सांगून जनतेची दिशाभूल केली जात आहे. महापालिका नागरिकांचे हक्क हिरावून घेऊ शकत नाही. नागरिकांने मृर्त्या विसर्जित केल्या तर श्रद्धा जपली जाईल, असेही नाईक म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button