ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

संरक्षण मंत्रालयाकडून साइट क्लिअरन्स रद्द ? आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्वप्न लांबणीवर

पिंपरी । मनिषा थोरात-पिसाळ

संरक्षण मंत्रालयाकडून नियोजित पुरंदर विमानतळाचा साइट क्लिअरन्स रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुणेकरांचे भव्य आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्वप्न लांबणीवर पडण्याची शक्यता असून, नियोजित विमानतळासाठी अजूनही प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे दिसत आहे.मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, उद्योग आणि कृषी अध्यक्ष सुधीर मेहता यांनी याप्रकरणी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, ‘पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाचा साइट क्लिअरन्स संरक्षण मंत्रालयाकडून रद्द केल्याचे दिसते, याचा अर्थ प्रकल्प देखील मृत झाला आहे. राज्य सरकाने पुण्यातील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी ही विनंती.’

पुरंदर तालुक्‍यातील सात गावांमधील 2 हजार 832 हेक्‍टर जागेवर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. केंद्र आणि राज्य सरकार तसेच एअरपोर्ट ॲथॉरिटी, संरक्षण मंत्रालयासह सर्व परवानग्या या जागेसाठी मिळाल्या आहेत. मात्र या सातही गावातील गावकऱ्यांनी आणि स्थानिक आमदार संजय जगताप यांनी विमानतळास विरोध दर्शविला होता. त्यात आता संरक्षण मंत्रालयाकडून साइट क्लिअरन्स रद्द केल्याने विमानतळाच्या भवितव्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button