breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

“इस्लाम देशाचा खरा शत्रू”, संभाजी भिडेंच्या या विधानावर एमआयएमचं प्रत्युत्तर; म्हणे, “अशा प्रकारचा माणूस…”!

पुणे |

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आपल्या विधानांमुळे अनेकदा वादात सापडतात. मात्र, तरीदेखील आपल्या विधानांवर ते ठाम असतात. नुकतंच त्यांनी हिंदू-मुस्लीम धर्माविषयी केलेलं एक वक्तव्य वादाचा विषय ठरलं. यामध्ये संभाजी भिडे इस्लाम देशाचा खरा शत्रू असल्याचं म्हणत आहेत. या विधानावरून आता प्रतिक्रिया उमटू लागल्या असून एमआयएम पक्षानं भिडेंना प्रत्युत्तर दिलं आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना संभाजी भिडेंवर परखड शब्दांत निशाणा साधला आहे.

  • काय म्हणाले होते संभाजी भिडे?

संभाजी भिडे यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना “ज्या इस्लामच्या पोटतिडकीतून औरंगजेबाने संभाजी महाराजांना मारलं, तो इस्लाम हा आपल्या देशाचा खरा शत्रू आहे,” असं म्हटलं आहे. “औरंगजेब आणि संभाजी ही दोन माणसं होती, त्यांचं वैर होतं म्हणून औरंगजेबने संभाजी महाराजांना तुकडे तुकडे करुन मारलेलं नाहीय. त्याच्या अंतकरणातील इच्छा होती ती वेगळी होती. कन्याकुमारी ते काश्मीर असा उभा देश तुकडे तुकडे करुन हा हिंदू धर्म, हिंदू समाज आणि हिंदीूस्थान संपवून टाकावा ही त्याच्या पोटातील आग आणि चीड, दृष्ट भावना त्याने संभाजी महाराजांच्या बलिदानातून पूर्ण करुन घेत अंशत: समाधान मिळवलं,” असं देखील संभाजी भिडे म्हणाले.

दरम्यान, या मुद्द्यावरून आता आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाली असून एमआयएमकडून इम्तियाज जलील यांनी संभाजी भिडेंना प्रत्युत्तर दिलं आहे. “अशा प्रकारचा माणूस गुरुजी होऊ शकत नाही. लोकांना चांगलं ज्ञान देणाऱ्या व्यक्तीला आपण गुरुजी म्हणतो. अशा लोकांना आपण गुरुजी म्हणत नाही”, असं जलील म्हणाले आहेत.

  • अजमल कसाब आणि संभाजी भिडेंची तुलना

“अजमल कसाब नावाचा एक दहशतवादी होता ज्यानं आपल्या देशावर हल्ला केला होता. बंदुकीच्या जोरावर आपल्या देशाला कमकुवत करण्याचा उद्देश त्याचा होता. पण यांच्यासारखे (संभाजी भिडे) लोक बंदुकीचा वापर करत नाहीत. पण आपल्या जिभेचा वापर करतात. त्यांचा देखील उद्देश या देशाला कमजोर कसं करता येईल, समाजात तेढ कशी निर्माण करता येईल हाच आहे”, असं इम्तियाज जलील म्हणाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button