breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांचे मुंबईत निधन

मुंबई – गिरणी कामगारांच्या हक्कासाठी लढा देणारे गिरणी कामगार संघर्ष समितीचे दत्ता इस्वलकर यांचे बुधवारी (7 एप्रिल) दुःखद निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. तब्येत बिघडल्याने दोन दिवसांपूर्वीच त्यांना मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र काल सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, ४ मुले आणि नातवंडे असा परिवार आहे.

वाचा :-राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 31,73,261 वर

मुंबईतील ऐतिहासिक गिरण्यांच्या संपात वाताहत झालेल्या गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळावी यासाठी लढा उभारणारे नेते दत्ता इस्वलकर यांच्या जाण्याने विस्थापित झालेल्या गिरणी कामगारांचा हक्काचा माणूस हरपल्याची भावना गिरणी कामगारांमध्ये निर्माण झाली आहे. दत्ता इस्वलकर हे मुंबईतील गिरणी कामगार संघर्ष समितीचे नेते होते. गिरणी कामगारांना मुंबईत घरे मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले आंदोलन विशेष गाजले होते. त्यांनी आयोजित केलेल्या मोर्चांना गिरणी कामगारांचा मोठा प्रतिसाद मिळत असे. मागील तीन ते चार वर्षांपासून ते दुर्धर आजाराने त्रस्त होते. काल सकाळी त्यांच्या मेंदूतील रक्तस्त्राव गोठल्यानंतर त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

मुंबईतील मॉडर्न मिलमध्ये दत्ता इस्वलकर यांचे वडील नोकरीला होते. 1970 साली वयाच्या 23व्या वर्षी दत्ता इस्वलकर हे मॉडर्न मिलमध्ये नोकरीला लागले. राष्ट्र सेवा दल आणि समाजवादी चळवळीतील अनेक संस्था संघटनांशी निकटचा संबंध असलेले दत्ता इस्वलकर यांनी 1987 नंतर गिरणी कामगारांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्यास प्राधान्य दिले होते. रायगड जिल्ह्यातील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टचे ते उपाध्यक्ष होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button