ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

मेट्रो कामगाराचा डोक्यात सळईचा बंडल पडल्याने मृत्यू ; क्रेन ऑपरेटर विरोधात गुन्हा

पिंपरी चिंचवड | पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. नाशिक फाटा, पिंपळे गुरव येथे मेट्रो साठी लागणाऱ्या सिमेंटचे उड्डाणपूल बांधले जातात. याच बांधकाम साईवरती शुक्रवारी (दि.31) दुपारी बारा वाजता अपघात झाला. यामध्ये मेट्रो कामगाराच्या डोक्यात सळईचा बंडल पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी क्रेन ऑपरेटर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एकलाश नजीर शेख (वय 27) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे.

याप्रकरणी त्याचा भाऊ फेकाहल अजीबुल शेख (वय 26, रा. दत्तमंदिर जवळ, पिंपळे गुरव ) यांनी शुक्रवारी (दि.31) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुधीर कुमार विनोद रॉय (रा. दत्तमंदिर जवळ, पिंपळे गुरव ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत एकलाश हा ट्रकमधून आलेल्या सळई क्रेनच्या सहाय्याने खाली करण्याचे काम करत होता. सुरक्षेसाठी त्याने डोक्यात हेल्मेट देखील घातले होते. दरम्यान क्रेन ऑपरेटर रॉय याने सळईचा बंडल जास्त वरती उचलला त्यामुळे बॅलन्स होऊ न शकल्याने तो बंडल एकलाश याच्या डोक्यावर पडला. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या एकलाश याचा मृत्यू झाला आहे. क्रेन ऑपरेटर रॉय याने हायगयीने क्रेन चालविल्याने हा अपघात झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button