breaking-newsराष्ट्रिय

#MeToo: भारतात परतले अकबर, लवकरच सर्व आरोपांना देणार उत्तर

#MeToo अभियानात काही महिलांकडून करण्यात आलेल्या लैंगिक छळाच्या आरोपानंतर केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम जे अकबर रविवारी सकाळी भारतात परतले आहेत. विमानतळावरुन बाहेर जाताना पत्रकारांच्या प्रश्नांवर त्यांनी याप्रकरणी लवकरच उत्तर देणार असल्याचे सांगितले. तुम्ही राजीनामा देणार का, असा पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी त्यावर उत्तर देणे टाळले.

दरम्यान, देशभरात व्यापक स्तरावर सुरु असलेल्या #MeToo अभियानात काही महिलांनी एम जे अकबर यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. त्यानंतर अकबर यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला आहे. या आरोपांवर अकबर यांच्या स्पष्टीकरणानंतर भाजपा आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. भाजपातील सूत्रांच्या मते, अकबर यांच्यावरील या गंभीर आरोपांमुळे ते मंत्रिपदावर जास्त काळ राहण्याची शक्यता नाही. भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

तत्पूर्वी, हे आरोप सत्य आहेत की चुकीचे हे पाहावे लागेल, असे अमित शाह यांनी म्हटले होते. ज्यांनी आरोप केले आहेत, त्यांच्या पोस्टची सत्यता पडताळून पाहावी लागेल. तुम्ही माझ्या नावाचा उपयोग करुन काहीही लिहू शकता, असे शाह यांनी म्हटले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button