breaking-newsपिंपरी / चिंचवड

महिलांच्या वेदना पुरुष समजून घेत नाहीत, हे निंदनीय – ह.भ.प. पंकज महाराज गावडे

तळेगाव : आयुष्यात त्यागाशिवाय काहीही शक्य नाही. प्रत्येक पुरुषाच्या यशामागे महिलांनी कुटुंबासाठी केलेला त्याग असतो. पण महिलांच्या वेदना पुरुष समजून घेत नाहीत, ही निंदनीय बाब आहे. त्यामुळे महिलांचा सन्मान करायला शिकले पाहिजे, अशा शब्दात ह.भ.प. पंकज महाराज गावडे यांनी विचार व्यक्त केले. तळेगाव दाभाडे येथील श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सी. यांच्या संयुक्तपणे महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या  पुरस्कार वितरण समारंभात ह.भ.प. पंकज महाराज गावडे बोलत होते. कार्यक्रमात सारिका सुनील शेळके यांना राजमाता जिजाऊ समाजरत्न महिला पुरस्कार, सेवाधाम ग्रंथालय व वाचनालयाच्या सचिव डॉ. वर्षा वाढोकर यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समाजरत्न महिला पुरस्कार, शांताबाई मोहनराव काकडे यांना ‘शांताई आदर्श माता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

तसेच शैक्षणिक क्षेत्रात कर्तृत्व साध्य करणार्‍या कुसुम शिवाजी वाळुंज, सहकार क्षेत्रात शबनम अमिन खान, साहित्यिक क्षेत्रात ज्योती नागराज मुंडर्गी, वैद्यकीय क्षेत्रात शोभा पोपट कदम, कृषी व उद्योग क्षेत्रात सुरेखा मनोहर काशिद, सांस्कृतिक क्षेत्रात अंजली विवेक सहस्रबुद्धे, सांप्रदायिक क्षेत्रात चांगुणाबाई जगन्नाथ भेगडे, उत्कृष्ट महिला बचत गट म्हणून माळवाडीच्या सावित्रीबाई फुले महिला बचत गटाला गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबर भेगडे, मावळचे आमदार सुनिल शेळके, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे, श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक संतोष खांडगे, डॉ. कृष्णकांत वाढोकर, गणेश काकडे, बाळासाहेब शिंदे, दादासाहेब उऱ्हे, सुमती निलवे, रजनीगंधा खांडगे, वसंत खांडगे, किरण काकडे, सुदाम दाभाडे, मच्छिंद्र घोजगे, मिलिंद शेलार, विल्सेंट सालेर, प्रविण भोसले, सचिन कोळवणकर, पांडुरंग पोटे, सुनिल खोल्लम, विलास भेगडे, विलास टकले, सुवर्णा मते, ज्योती नवघणे, सुलोचना खांडगे, डाॅ. सत्यजित वाढोकर, रवींद्र दंडेलवाल, दामोदर शिंदे, बबनराव ढोरे, राजेंद्र काळोखे, सोनबा गोपाळे, संदीप पानसरे आदी मान्यवर उपस्थित होते.  ह.भ.प. पंकज महाराज गावडे म्हणाले, की आई गेल्यानंतर आईची महती कळते. म्हणून आई जपली पाहिजे. आईवडील गेल्यानंतर मुलीचे माहेर संपते, हे वास्तव व दुर्दैवी आहे. पुरुष घडत असताना स्त्रीची प्रतिमा झाकोळली जाऊ नये. कारण स्त्री शिवाय पुरुषाला कर्तृत्वाला अर्थ नाही. संपूर्ण स्वराज्य निर्माण करण्याची ताकद स्त्री मध्ये आहे, हे विसरून चालणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

आमदार सुनील शेळके म्हणाले, की राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, उद्योग अशा सर्वच क्षेत्रात महिलांनी नावलौकिक मिळवित देशाच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. विविध क्षेत्रात महिलांना पुरस्कार मिळत आहेत, हे महिला किती सक्षम आहेत, याचाच पुरावा आहे. यशस्वी पुरुषांना महिलांचे मोठे पाठबळ मिळल्यानेच ते प्रगती करू शकले. माजी आमदार दिगंबर भेगडे यांनी सांगितले, की अनेक महिलांनी आपल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करून नावलौकिक मिळविला आहे. महिलांना भरपूर संधी आहेत. फक्त मनापासून काम केले पाहिजे. पुरस्काराने जबाबदारी वाढते. प्रेरणा मिळते. आता महिलांनी अधिक गतीने काम केले पाहिजे. दरम्यान, गणेश खांडगे, तसेच पुरस्कारार्थी सारिका सुनील शेळके, डॉ. वर्षा वाढोकर, मनीषा दाभाडे, वृषाली काकडे यांनीही विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष खांडगे यांनी केले. त्यांनी तिन्ही संस्थांच्या कार्याचा आढावा घेतला. सूत्रसंचालन कुसुम वाळुंज, लक्ष्मण मखर व अनिल धर्माधिकारी यांनी, तर सुमती निलवे यांनी आभार मानले.

शाळेसाठी 1 लाख 11 हजार रुपयांची देणगी 

जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव येथील शाळा मोडकळीस आलेल्या शाळेसाठी निधीची गरज असल्याचे पंकज महाराज गावडे यांनी सांगताच उद्योजक गणेश काकडे आणि किरण काकडे यांनी तात्काळ 1 लाख 11 हजार रुपयांची देणगी जाहीर केली. यातून आईने मुलांवर केलेल्या संस्कारांचे दर्शन झाले, असा उल्लेख संयोजकांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button