breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक!

मुंबई | प्रतिनिधी 
मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील देखभाल आणि दुरुस्तीसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार अप व डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.३६ या दरम्यान सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविल्या जातील.

या सेवा भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव, आणि कुर्ला या स्थानकावर थांबतील व विद्याविहार येथे पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. तर हार्बर रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी / वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे /गोरेगाव करीता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. पश्चिम रेल्वेलाही मेगा ब्लॉकचा फटकापश्चिम रेल्वेवर आज बोरिवली ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी १०. ३५ ते दुपारी ३.३५ पर्यत दुरुस्ती काम करण्यात येणार आहे.

या दरम्यान जलद मार्गावरील वाहतूक जलद मार्गावरुन चालविण्यात येतील. तसेच दोन्ही दिशेकडील मार्गावरील काही लोकल गाड्या रद्द करण्यात आल्यात.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button