ताज्या घडामोडीराष्ट्रिय

मॅकडोनाल्ड्स रशियातील ८५० रेस्टोरंट्स बंद करणार!

मॉस्को | रशिया-युक्रेन युद्धाचा आज १४वा दिवस. रशिया युक्रेनवरील हल्ले दररोज अधिक धारदार करत असून जगभरात याबाबत निराशा आहे. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत अनेक देशांनी रशियावर वेगवेगळे निर्बंध लावले आहेत. तर अनेक मोठ-मोठ्या कंपन्याही रशियाच्या विरोधात आणि युक्रेनच्या समर्थनार्थ पावलं उचलताना दिसत आहेत. यात आता मॅकडोनाल्ड्सनेही रशियातील आपले रेस्टॉरंट्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मॅकडोनाल्ड्स रशियातील आपली ८५० रेस्टॉरंट्स बंद करणार आहे.

मॅकडोनाल्ड्सचे अध्यक्ष क्रिस केम्पचिंस्की यांनी रशियातील सर्व ८५० रेस्टोरंट्समधील आपल्या कर्मचाऱ्यांना एक पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटलंय, ‘आपल्या तत्त्वांनुसार आपण युक्रेनमधील निष्पाप लोकांना होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. त्यामुळे आपण रशियातील आपले ८५० रेस्टोरंट्स बंद करत आहोत, मात्र असे असले तरी आपल्या ६२ हजार कर्मचाऱ्यांचे वेतन सुरूच राहणार’, असे कंपनीने सांगितले आहे. आमच्या कर्मचाऱ्यांनी मॅकडोनाल्ड्स ब्रँडसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे, अक्षरश: घाम गाळला आहे, असे म्हणून कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांचे कौतुकही केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रशियातील ८४ टक्के रेस्टॉरंट मॅकडोनाल्डकडे आहेत. गेल्या वर्षी कंपनीच्या महसुलात रशिया आणि युक्रेनचा वाटा ९ टक्के असल्याचे कंपनीने म्हटले.

दरम्यान, ‘स्टारबक्स’नेही मागील शुक्रवारी असे जाहीर केले होते की, रशियातील आपल्या १३० स्टोअर्समधून मिळणारे उत्पन्न युक्रेनमधील लोकांना वाचविण्यासाठी दान करण्यात येईल. तसेच यापूर्वी केएफसी आणि पिझ्झा हट यांनीही त्यांची गुंतवणूक थांबवण्याचा निर्णय घेत युक्रेनला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button