breaking-newsमहाराष्ट्र

MBA MCET result 2020 जाहीर, ‘या’ वेबसाईट्सवर निकाल पाहा

मुंबई : एमबीए आणि एमएमएस अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.  राज्यातील एकूण 36 हजार जागांसाठी ही प्रवेश पूर्वपरीक्षा 14 आणि 15 मार्च रोजी घेण्यात आली होती.  MAH MBA CET result 2020 या परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाईट  mahacet.org  किंवा cetcell.mahacet.org यावर पाहू शकता

राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी परीक्षेचा निकाल सीईटी सेलच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार असल्याची माहती दिली होती. त्यानुसार आज (23 मे) सकाळी 11 वाजता संकेतस्थळावर परीक्षेचा निकाल जाहीर झाला.

ही परीक्षा एकूण 175 गुणांची घेण्यात आली होती. या परीक्षेत 4 विद्यार्थ्यांना 151 ते 175 दरम्यान गुण प्राप्त झाले आहेत. तर 392 विद्यार्थ्यांना 126 ते 150 दरम्यान गुण प्राप्त झाले आहेत. 101 ते 125 दरम्यान गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 3 हजार 924 इतकी आहे. तर 51 ते 100 दरम्यान गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 55 हजार इतकी आहे.

या परीक्षेसाठी एकूण 1 लाख 24 हजार 236 विद्यार्थ्यींनी नोंदणी केली होती. त्यापैकी 1 लाख 10 हजार 631 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. ही परीक्षा एकूण 184 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रातील 135 तर महाराष्ट्राबाहेरील 13 परीक्षा केंद्रांचा समावेश आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button