breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

Maval Loksabha : जोरदार शक्तीप्रदर्शनात उमेदवार पार्थ पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

  • पदयात्रेला मिळाला कार्यकर्त्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
  • डीजेवर घुमला ‘राष्ट्रवादी पुन्हा…’चा आवाज

पिंपरी ( महा-ई-न्यूज ) – मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी, काॅंग्रेस, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह रिपाई मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार पार्थ पवार यांनी आज मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज मावळ निवडणूक निर्णय अधिका-यांकडे दाखल केला. त्याअगोदर वाल्हेकरवाडी येथून महाआघाडीने ढोलताशाचा निनाद, डीजेवर ‘राष्ट्रवादी पुन्हा…’चा आवाज आणि कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसरात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

निगडीतील नवनगर विकास प्राधिकरणाच्या निवडणूक कार्यालयात पार्थ पवार यांनी अर्ज दाखल केला. पवार यांचा अर्ज दाखल करताना आमदार सुरेश लाड, शेकापचे आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार मीनाक्षी पाटील, पार्थच्या आई सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे उपस्थित होते.

महाआघाडीच्या वतीने सकाळी 10 वाजता वाल्हेकरवाडी ते निगडी प्राधिकरण निवडणूक कार्यालयापर्यंत महारॅली काढण्यात आली. या रॅलीत पार्थचे वडील माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, माजी आमदार अण्णा बनसोडे, काॅंग्रेसचे अकुंश काकडे, मावळचे बापूसाहेब भेगडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, राष्ट्रवादी पुणे महिला शहराध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी महापौर मंगला कदम, माजी महापाैर योगेश बहल, माजी आमदार आण्णा बनसोडे, नगरसेवक मयूर कलाटे, राजू मिसाळ, जय पवार, निहाल पानसरे, संदीप पवार, वर्षा जगताप, आजी-माजी नगरसेवक, महाआघाडीचे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिंनी आदी उपस्थित होते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button