breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Maval Loksabha : उमेदवारांचे देव पाण्यात, कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला

  • खासदार श्रीरंग बारणे की पार्थ पवार विजयी होणार?
  • राष्ट्रवादी, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना लागली उत्सुकता

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – राज्यातील लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदार संघाच्या निकालाबाबत राजकीय क्षेत्रात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. कारण, राज्याचे नेते शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी विद्यमान शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात निवडणूक लढविली आहे. विजयासाठी दोन्ही उमेदवारांनी देव पाण्यात ठेवले असून त्यांच्या कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोचली आहे.

  • मावळ लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार आणि शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्यात जोरदार लढत झाली आहे. पार्थ पवार हे नवखे उमेदवार प्रतिस्पर्धक असले तरी खासदार बारणे यांनी संपूर्ण राजकीय ताकद पनाला लावून तोडीस तोड लढा दिला आहे. उरण, पनवेल, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभेत शिवसेनेचे दोन आणि भाजपचे तीन आमदार असल्यामुळे बारणे यांना या पाच मतदार संघातून उच्चांकी मताधिक्य मिळाल्याचा समर्थकांचा दावा आहे. पनवेल आणि चिंचवडमधून बारणे यांना लीड मिळणार अशी चर्चाही शिवसैनिकांमध्ये सुरू आहे.

तर, त्यांचे प्रतिस्पर्धक पार्थ पवार यांनी देखील निवडणुकीपूर्वी रात्रीचा दिवस करून शरद पवार आणि अजित पवार यांना मानणारे जुने जानते माजी पदाधिकारी व निष्ठावंत कार्यकर्ते यांची मोठ बांधली आहे. उरण, कर्जत आणि मावळ विधानसभा मतदार संघातील गावांगावात, पाड्यांवर जाऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला आहे. त्यांचे प्रश्न जाणून घेतले आहेत. शिवसेनेच्या गेल्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळातील प्रलंबित प्रश्न जाणून नागरिकांच्या नाराजीची दखल घेतली आहे. पनवेल, खारघर भागात मुक्कामी राहून त्यांनी सोसायट्या, कॉलन्यांमधील रहिवाशांच्या वैयक्तीक भेटीगाठी, बैठका घेऊन चर्चा केली आहे. त्यांनी मांडलेले प्रश्न प्रकर्षाने संसदेत मांडून पाठपुराव्यानिशी सोडविण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. त्या भागातील बलाढ्य शेतकरी कामगार पक्षाने देखील त्यांना साथ दिली आहे. विशेष म्हणजे मनसैनिकांनी सुध्दा पार्थ पवार यांच्यासाठी रात्रीचा दिवस केला आहे.

  • त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ हे पनवेलमधूनच लीड घेऊन उठणार असल्याचा निष्कर्श स्थानिक राष्ट्रवादी, शेकाप आणि मनसेच्या पदाधिका-यांनी काढला आहे. पिंपरी-चिंचवड आणि मावळवर नेते शरद पवार आणि अजित पवार यांची मोहर आहे. या भागात महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या माध्यमातून तळागाळात राष्ट्रवादीची टिकटिक सातत्य धरून आहे. त्यामुळे या भागातून पार्थ पवार यांनाच मताधिक्य मिळाले असल्याचे कार्यकर्ते छातीठोकपणे सांगू लागले आहेत.

निवडणुकीत अत्यंत चुरस निर्माण झालेली असताना बारणे आणि पवार यांच्यापैकी कोणाचा विजय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अत्यंत चुरसीची निवडणूक झाल्याने राज्यभरात सर्वांना मावळ लोकसभेच्या निवडणुकीची उत्सुकता लागून राहिली आहे. येत्या 23 मे रोजी निकाल लागताच ही उत्सुकता थंडावणार आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button