Maval Loksabha : दिग्गजांच्या उपस्थितीत उमेदवार श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (मंगळवारी) उमेदवारी अर्ज दाखल केला. आकुर्डी खंडोबामाळ ते निगडी प्राधिकरण या मार्गावर रॅली काढली. बैलगाडीतून मिरवणूक, ढोलताशा आणि महायुतीचा जयघोषात रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीला ग्रामदैवत खंडोबाच्या दर्शनाने सुरुवात झाली.
खासदार श्रीरंग बारणे यांनी रॅलीला सुरुवात करण्यापूर्वी जगदगुरु संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर आकुर्डी येथील श्री खंडोबाचे दर्शन घेतल्यानंतर रॅली सुरू झाली. ढोलताशांच्या गजरात आणि घोषणांच्या गजरात रॅली सुरू झाली. बैलगाडीतुन मिरवणूक निघाली आहे. यावेळी महायुतीच्या घटकपक्षातील हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थिती दाखवली.
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, पालकमंत्री गिरीश बापट, शिवसेना नेत्या निलम गो-हे, खासदार अमर साबळे, भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार गौतम चाबुकस्वार, प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे, आमदार शरद सोनवणे, गटनेते राहुल कलाटे, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, बाळा भेगडे, मनोहर भोईर, अमित गोरखे, चंद्रकांत सोनकांबळे,प्रशांत ठाकूर, आदी उपस्थित होते.