breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोंदियात सामूहिक हत्याकांड! तिघांची हत्या करत आरोपीने स्वत:लाही संपवलं

गोंदिया – एकाच कुटुंबातील तिघांचा खून करून आरोपीने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील चुरडी येथे ही घटना घडली. यामध्ये हत्या झालेले सर्वजण एकाच कुटुंबातील असून हत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

रेवचंद डोंगरु बिसेन (वय 51), मालता रेवचंद बिसेन (वय 45), पौर्णिमा रेवचंद बिसेन (वय 20), तेजस रेवचंद बिसेन (वय 17) अशी मृतांची नावे आहेत. आज सकाळ बिसेन कुटुंबीय घराबाहेर दिसले नाही. त्यामुळे शेजाऱ्यांनी चौकशी केली असता तिघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले, तर एकाचा मृतदेह लटकलेला होता. त्यानंतर तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. तसेच खुनाचे कारण अद्याप कळू शकले नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button