ताज्या घडामोडीराष्ट्रिय

शहीद-ए-आझम भगतसिंग यांच्या हुतात्मा पंजाबमध्ये सुट्टी; भगवंत मान सरकारची घोषणा

 

चंदिगढ  |   शहीद-ए-आझम भगतसिंग यांच्या हुतात्मा दिनानिमित्त २३ मार्च रोजी पंजाबमध्ये सुट्टी असेल. भगवंत मान सरकार यांनी ही घोषणा केली आहे. यानिमित्ताने पंजाबचे नागरिक, येथील वडिलधारी माणसे आणि लहान मुले भगतसिंग यांना त्यांच्या खटकरकलन या गावी जाऊन श्रद्धांजली अर्पण करू शकतील असे, पंजाब विधानसभेत मुख्यमंत्री भगवंत मान यांनी संगितले.

यासोबतच पंजाब विधानसभेत भगतसिंग आणि बाबा साहेबांचे पुतळे बसवण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे. तर पंजाब विधानसभेत महाराजा रणजित सिंह यांचा पुतळाही बसवण्यात येणार आहे. २३ मार्च १९२१ रोजी ब्रिटीश सरकारने भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी दिली. त्यानंतर हा दिवस शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने हि सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, भगवंत मान यांनी नुकतीच पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली असून, त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांना खात्यांचे वाटप केले होते. मुख्यमंत्र्यांनी गृह आणि न्याय खात्याची जबाबदारी स्वतःकडे ठेवली आहे, तर हरपाल सिंग चीमा यांच्याकडे वित्त खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर मंत्री लाल चंद यांना अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक व्यवहार, वन आणि वन्यजीव विभाग, तर गुरमीत सिंग मीत हरे यांना शालेय शिक्षण, क्रीडा आणि युवक सेवा आणि उच्च शिक्षण विभाग देण्यात आले आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button