breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदी कायम राहणार?; भोवानीपूर पोटनिवडणुकीचा निकाल आज

पश्चिम बंगाल |

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदी ममता बॅनर्जी या कायम राहणार की नाही याबाबत आज निर्णय होणार भोवानीपूर पोटनिवडणूकीत होणार आहे. मुख्यमंत्री पदी राहण्यासाठी ममता बॅनर्जी यांच्यासाठी या जागेवर विजय मिळवणे फार महत्वाचे आहे. मात्र भाजपाच्या प्रियांका तिब्रेवाल यांनी त्यांना कडवी लढत दिली आहे. भोवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी कडेकोट बंदोबस्तात होणार आहे. भवानीपूर व्यतिरिक्त, शमशेरगंज आणि जंगीपूर विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकांचे निकालही जाहीर केले जातील. नंदीग्राम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक हरल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या जागेवरून निवडणूक लढवली आहे.

पश्चिम बंगालच्या महत्त्वाच्या अशा भोवानीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ३० सप्टेंबर रोजी मतदान पार पडल्यानंतर आता सर्वांच्या नजरा आज येणाऱ्या निकालाकडे लागल्या आहेत. निवडणूक आयोगाने मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे. रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल. या दरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी भोवानीपूर विधानसभा मतदारसंघात ५७ टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. भवानीपूर हा कोलकात्यातील विधानसभा मतदारसंघ आहे आणि तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो.

ममता बॅनर्जी २०१६ मध्ये या जागेवरून विजयी झाल्या होत्या आणि त्यामुळे यावेळी त्या जिंकतील अशी त्यांना आशा आहे. तृणमूलच्या अनेक नेत्यांनी या जागेवर ममतांचा विजय आधीच मान्य केला आहे. तृणमूलसोबतच भाजपानेही आपल्या विजयाचे दावा केला आहे. भाजपाने ममतांच्या विरोधात प्रियांका तिब्रेवाल यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष म्हणाले की, भवानीपूरमध्ये भाजपा खूप चांगली लढत देईल. त्यांनी या जागेवर विजय मिळेल अशी आशा व्यक्त केली. दरम्यान, भोवानीपूर पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी सुरू होणार आहे. याआधीच भाजपाच्या उमेदवार प्रियांका तिब्रिवाल यांनी कोलकता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहून निकाल जाहीर झाल्यानंतर संभाव्य हिंसा रोखण्यासाठी उपाययोजनांची मागणी केली आहे. सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रात प्रियंका तिब्रीवाल यांनी कोलकाता पोलिसांना पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा हिंसाचार टाळण्यासाठी सर्व खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे कडक आदेश देण्यास सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button