मामाने केला अल्पवयीन भाचीवर बलात्कार
पिंपरी l प्रतिनिधी
मामाने त्याच्या अल्पवयीन माचीवर बलात्कार केला. यामध्ये अल्पवयीन भाची गरोदर राहिली. हा धक्कादायक प्रकार 2 आणि 3 जानेवारी 2022 या कालावधीत खेड तालुक्यातील सावरदरी येथे घडली.
याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने शनिवारी (दि. 14 मे) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 30 वर्षीय मामाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडित मुलीचा मामा आहे. तो फिर्यादीला फोनवर बोलत असताना पीडित भाचीसोबतही बोलत असे. 1 जानेवारी 2022 रोजी आरोपी फिर्यादी यांच्या घरी आला. फिर्यादी कामानिमित्त 2 जानेवारी रोजी बाहेर गेल्या. पीडित मुलीच्या बहिणी खेळण्यासाठी घराबाहेर गेल्या असता आरोपीने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केला. 3 जानेवारी रोजी देखील असाच प्रकार घडला. यामध्ये अल्पवयीन पीडित मुलगी गरोदर राहिली. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.