breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

मलिक देशमुखांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाहीच, सोमय्यांनी ट्विट करत मविआला डिवचलं

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टानं राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आहे. मात्र, या याचिकेवर पुढील चार आठवड्यांपर्यंत सुनावणी सुरु ठेवली जाईल, असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मिळालेली नाही. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना आता विधानपरिषद निवडणुकीत मतदान करता येणार नाही हे स्पष्ट झालं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर तातडीनं ट्विट करत महाविकस आघाडीवर टीका केली आहे. सुप्रीम कोर्टात या प्रकरणी सुनावणी सुरु राहणारअनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना तातडीनं दिलासा देण्यास नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टात यापुढे या प्रकरणी सुनावणी सुरु ठेवण्याचे संकेत दिले आहेत. सुप्रीम कोर्टानं अंतिम आदेश दिला नसल्यानं नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची याचिका इतर तुरुंगात असलेल्या लोकप्रतिनिधींच्या मतदानासाठी निर्णायक ठरु शकतो. किरीट सोमय्यांचं तातडीनं ट्विटसुप्रीम कोर्टानं अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या याचिकेवर तातडीनं दिलासा देण्यास नकार दिला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. ठाकरे सरकारला आणखी “थप्पड” . सर्वोच्च न्यायालयानं नवाब मलिक आणि अनिल देशमुख ची याचिका फेटाळली, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत. गाडी स्लीप झाल्याने मणक्याला दुखापत, ‘मविआ’चा मंत्री मतदान केंद्रातून थेट रुग्णालयातविधानपरिषदेसाठी मतदान पूर्णमहाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील १० जागांच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळं त्यांची जागा रिक्त आहे. तर, नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानासाठी परवानगी मिळालेली नाही. त्यामुळं २८५ आमदारांना मतदान करता येणार होतं. २८५ आमदारांनी मतदान केलं आहे. आता वैध आणि अवैध मत बाजूला केली जातील आणि त्यानंतर मतमोजणी पूर्ण होईल.
भाजपला लक्ष्मणभाऊंपेक्षा चांगले नेते कुठून मिळणार? जगतापांच्या पक्षनिष्ठेने फडणवीस भारावलेविधानपरिषदेत विजय कुणाला?भाजपकडून प्रविण दरेकर, राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, प्रसाद लाड विधानपरिषद निवडणूक लढवत आहेत. तर शिवसेनेनं सचिन अहिर, आमश्या पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेसनं रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे, काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे. विधानपरिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आता कोणत्या उमेदवाराचा पराभव होतो ते पाहावं लागणार आहे. अग्निपथ योजनेमुळे महाराष्ट्रात वातावरण तापलं, पुण्यात राष्ट्रवादी रस्त्यावर
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button