breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

महेश लांडगे ‘ऑन प्रॅक्टिकल मोड’ : अधिकारी पिंपरी- चिंचवडकर आहेत; आयुक्तांचे ऐका अन् माझे फ्लेक्स काढून टाका!

  • महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या आदेशानुसार फ्लेक्स स्वतः काढून टाका
  • भाजपा शहराध्यक्ष तथा महेश लांडगे यांचे कार्यकर्ते, समर्थकांना आवाहन

पिंपरी | प्रतिनिधी

पिंपरी- चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील राजकीय दबावाखाली काम करीत आहेत. मात्र, सर्व अधिकारी आपलेच पिंपरी- चिंचवडकर आहेत. आयुक्तांनी दिलेल्या आदेशाचे पालन करा आणि  त्यांना सहकार्य करा.  माझ्यासाठी लावलेले शुभेच्छा फ्लेक्स काढून टाका, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.

पिंपरी- चिंचवड शहरात आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेले फ्लेक्स, बॅनर आणि पोस्टर काढून टाकण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे भाजपा आणि आमदार लांडगे समर्थकामध्ये संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, भोसरीच्या गावजत्रा मैदानावर आमदार लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त ” रंग जल्लोष…पांडू स्पेशल” हा रेकॉर्ड ब्रेक गर्दीचा कार्यक्रम शुक्रवारी सायंकाळी सुरू होता. सुमारे ३५ हजार लोकांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या कार्यक्रमात आमदार महेश लांडगे यांनी आपल्या समर्थक, हितचिंतक आणि पदाधिकारी- नगरसेवक यांना भावनिक आवाहन केले.

आमदार लांडगे यांचा वाढदिवस २७ नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. याच पार्श्वूभूमीवर समर्थकांनी भोसरीसह संपूर्ण शहरात ठिकठिकाणी विविध समाजपयोगी कार्यक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन केले आहे. तशा प्रकारच्या शुभेच्छांचे बॅनरही शहरभर लावले आहेत. मात्र, प्रशासनाच्या सुचनेनंतर संबंधित बॅनर काढून टाकण्याची कारवाई सुरू झाली आहे. त्यामुळे आमदार समर्थक आणि हितचिंतकांमध्ये नाराजीचा सूर असून, प्रशासन राजकीय हेतूने राडीचा डाव करीत आहे, अशी टीका होऊ लागली आहे.


काय म्हणाले महेश लांडगे….?

आमदार लांडगे यांनी केलेल्या आवाहनामध्ये म्हटले आहे की,

महापालिकेच्या आयुक्तांनी आज सायंकाळी आपले फ्लेक्स, बॅनर, होर्डिंग काढायचे आदेश दिल्याचे समजले. त्याला अनुसरुन माझे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्र परिवार, नातेवाईक आणि हितचिंतक या सर्वांना नम्र आवाहन आहे की, महापालिकेचे अधिकारी हे सर्व आपलेच आहेत. शहराच्या विकासासाठी आपल्या खांद्याला खांदा लावून ते आपल्या सोबत काम करीत आहेत.

पण, त्यांच्यावर राज्य सरकार आणि नेत्यांचा असलेला दबाव आपण समजू शकतो. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतल्याचे लक्षात येते. गेले दीड-दोन वर्ष अधिकारी दबावाखाली काम करत असतानाही आपण प्रशासनाला सहकार्याची भूमिका घेतलेली आहे.
आजही माझ्या वाढदिवस अथवा वैयक्तिक कार्यक्रमामुळे जर अधिकारी आणि प्रशासनाला अडचण येत असेल. अधिकाऱ्यांना उत्तरे द्यावी लागत असतील, तर सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे.

उद्या (दि.२७) माझा वाढदिवस असला, तरी उद्याच सगळे फ्लेक्स तुम्ही स्वतःहून काढून टाका आणि अधिकारी व प्रशासनाला सहकार्य करा…याच मला वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत, असे मी समजतो.

आजवर प्रत्येक संघर्षात आपण साथ दिली, हा महेश लांडगे आयुष्यभर आपला विश्वास जपेल.

प्रशासनाला आणि अधिकाऱ्यांना सर्वोतोपरी सहकार्य करा…!

आपला,
महेश किसनराव लांडगे.
शहराध्यक्ष व आमदार, भाजपा, पिंपरी- चिंचवड.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button