breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘बांधकाम कामगारांना’ महाविकास आघाडीचे अर्थसहाय

  • बांधकाम कामगारांना मिळाले १५०० रुपये
  • कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे शासनाचे आभार

पिंपरी |महाईन्यूज|

महाराष्ट्रात कोरोनामुळे कडक निर्बंध लावण्यात आले राज्यातील संघटना करत असलेल्या मागणीनुसार या वेळी महाराष्ट्रातील श्रमिक कष्टकऱ्यांची जाणीव ठेवून लाभ जाहिर केले .त्यानुसार महाराष्ट्र राज्यात इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदित असलेल्या सुमारे १३ लाख बांधकाम कामगारांना पंधराशे रुपये प्रमाणे देण्याची प्रक्रिया सुरू झाली यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील कामगारानांही लाभ मिळायला सुरुवात झाली. संकटाच्या काळामध्ये राज्य शासनाने तातडीने रक्कम जमा केली त्याबद्दल वर्किंग पिपल चार्टर, कष्टकरी संघर्ष महासंघाने आज (गुरुवारी) राज्य शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करत कष्टकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

महासंघाचे अध्यक्ष अध्यक्ष काशिनाथ नखाते , उपाध्यक्ष भास्कर राठोड निरंजन लोखंडे, सुखदेव कांबळे , विनोद गवई, मनीषा ठाकर, चंद्रकांत जाधव, संगीता होले, मनीषा सावंत, सुनिता रोकडे, चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते

यावेळी नखाते म्हणाले ” सध्याचा काळ फार कठीण असून कामगारांच्या हाताला काम नाही आणि सध्या खर्च झेपत नाही अशी स्थिती आहे या कालावधीमध्ये अल्पशी रक्कम जरी मिळाली असली तरी पुढील कालावधीमध्ये लॉकडाऊन पुन्हा वाढला वाढणार असल्यामुळे परत पुन्हा एकदा नुतनिकरणाची अट न घलता अजून रक्कम वाढ करुन त्यांच्या खात्यामध्ये जमा करावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री हसन मुश्रीफ, उपसभापती नीलम गो-हे यानीं राज्य शासनाकडुन रिक्षाचालक, फेरीवाला, बांधकाम कामगार ,घरेलू कामगार यासह श्रमिक वर्गाला लाभ देण्याची भूमिका घेतली त्यानुसार त्यांना प्रत्येकी पंधराशे रुपये देण्याचे जाहीर केले त्यानुसार लाभ मिळण्यास सुरुवात झाली. सध्या ज्या कामगाराना काम मिळत नाही त्याना भोजन सुविधा सुरु करावी.मागील वर्षी चे जे लाभार्थिना सहाय्य मिळाले नाही त्यानां ही देण्यात यावे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button