breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणेराजकारण

महाविकास आघाडीचा दणका : भाजपाचे वर्चस्व असलेली पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त!

पुणे । प्रतिनिधी
राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने विरोधी पक्ष भाजपाला दणका दिला आहे. भाजपाचे वर्चस्व असलेल्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला बरखास्त करण्याचा मोठा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्ती असलेले महेश जाधव हे या समितीचे अध्यक्ष होते. विशेष म्हणजे, या समितीच्या अध्यक्षाला राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला होता. सिद्धीविनायक देवस्थान न्यास वगळता राज्यातील शिर्डी, पंढरपूर आदी सर्वच देवस्थान समितींवर भाजपाचे वर्चस्व आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून या समितींवरील वर्चस्व मोडीत काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र देवस्थान समित्या बरखास्त करण्याचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाने तयार केला होता. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त करण्यात आल्यानंतर त्याचा कार्यभार एक वर्षांसाठी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे देण्यात आला.
राज्यातील इतर समित्या रद्द करुन त्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात येणार आहे. त्यासाठी जागावाटप झाले असून, पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीकडे, शिर्डी काँग्रेसकडे आणि पंढरपूर व सिद्धीविनायक मंदिर न्यास शिवसेना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे.

समितीच्या अखत्यारीत ३ हजार ४२ मंदिरांचा समावेश…
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारित करवीर निवासीनी अंबाबाई, ज्योतिबा या प्रमुख मंदिरांसह कोल्हापूर, सांगली व सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ३ हजार ४२ मंदिरांचा समावेश आहे. याशिवाय तीस हजार एकरावर जमीन या समितीच्या ताब्यात आहे. भाजपाची सत्ता राज्यात २०१७ मध्ये महेश जाधव यांची या समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना राज्य मंत्रीपदाचा दर्जाही मिळाला होता. या समितीत वैशाली क्षीरसागर, शिवाजीराव जाधव, राजाराम गरुड, राजेंद्र जाधव, चारुदत्त देसाई यांचा समावेश होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button