breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

महात्मा गांधीजींच्या नातीला 7 वर्षांची शिक्षा

डर्बन – महात्मा गांधीजी यांची नात आशिष लता रामगोबिन यांना दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन येथील न्यायालयाने सात वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने त्यांना 6.2 मिलियन रॅन्ड (आफ्रिकन चलन) म्हणजेच सुमारे 3.22 कोटी रुपयांची फसवणूक आणि बनावट काम केल्याबद्दल दोषी ठरवले आहे.

56 वर्षीय आशिष लता रामगोबिन या सुप्रसिद्ध कार्यकर्ते एला गांधी आणि दिवंगत मेवा रामगोविंद यांच्या कन्या आहेत. दक्षिण आफ्रिकेत आपल्या कारकिर्दीच्या दरम्यान महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या फिनिक्स सेटलमेंट याचे पुनरुज्जीवित करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. दरम्यान, त्यांच्यावर उद्योगपती एस.आर. महाराज यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button