breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#MaharashtraWinter: ‘या’ जिल्ह्यात पारा ५.५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला; पुढील ४८ तास कडाक्याच्या थंडीचे

मुंबई |

संपूर्ण राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून थंडीचा तडाखा वाढला आहे, राज्‍यातील अनेक शहरे गारठली आहेत. आज म्हणजेच मंगळवारी राज्यामध्ये धुळे जिल्ह्यात सर्वाधिक कमी म्हणजे ५.५ अंश सेल्सिअस इतक्या निच्‍चांकी तापमानाची नोंद झालीय. गेल्या दोन दिवसांपासून धुळ्यामध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. त्यातच आज ही निच्चांकी तापमानाची नोंद झालीय.थंडीच्या कडाक्यामुळे धुळेकर चांगलेच गारठल्याचे बघावयास मिळत आहे. उबदार कपडे त्याचबरोबर शेकोटीचा आधार घेत धुळेकर गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत. संपूर्ण जिल्ह्यात चांगलाच गारठा वाढल्याचं चित्र दिसत आहे. रोजच्या किमान तापमानामध्ये आज आणखी घसरण झाली. पुढील ४८ तास धुळ्यामध्ये थंडीचा कडाका असाच राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

  • २२ डिसेंबरपासून पुन्हा तापमान वाढणार…

उत्तरेकडील राज्यात थंडीची लाट तीव्र झाल्यामुळे राज्यातील तापमानात आणखी घट होऊन गारव्यात वाढ झाली आहे. विदर्भात थंडीची लाट आली असून, बहुतांश भागातील तापमानाचा पारा ८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. थंडीची ही लाट आणखी एक दिवस कायम राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रातही काही भागांत तापमानाचा पारा १० अंशांखाली गेला आहे. २२ डिसेंबरपासून राज्यात सर्वच ठिकाणी तापमानात पुन्हा काही प्रमाणात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

  • रात्रीच्या किमान तापमानात मोठी घट

राज्यात सध्या सर्वच भागात निरभ्र आकाशाची स्थिती आणि कोरडे हवामान आहे. गेल्या दोन दिवसांपासून उत्तरेकडील राजस्थान, पंजाब, चंडीगड, हरियाणा, दिल्ली आदी राज्यांमध्ये थंडीची लाट आहे. ती सध्या तीव्र झाली असून, मध्य प्रदेश, उत्तराखंड, झारखंड आणि थेट विदर्भापर्यंत त्याचा परिणाम जाणवतो आहे. उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह वाढल्याने विदर्भात थंडीची लाट आहे. त्यामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही काही भागात रात्रीच्या किमान तापमानात मोठी घट झाली असून, बहुतांश भागात ते सरासरीच्या खाली आले आहे.

  • कोकण रत्नागिरीमध्येही सरासरीखाली तापमान…

विदर्भात सर्वच ठिकाणी किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत २ ते ६ अंशांनी कमी झाला असल्याने या भागात अंगाला झोबणारा गारवा आहे. या भागात आणखी एक दिवस थंडीची लाट कायम राहणार आहे. मध्य महाराष्ट्रात जळगाव, नगर, सातारा, सोलापूरमध्ये किमान तापमान सरासरीखाली गेले आहे. मराठवाड्यात औरंगाबाद, बीड, परभणीत पारा सरासरीखाली आहे. कोकणात रत्नागिरीचे किमान तापमान सरासरीखाली आहे.

  • नागपूर ७.८ अंश सेल्सिअस…

विदर्भात नागपूर आणि अमरावतीत थंडीची लाट असून, या भागात सोमवारी अनुक्रमे ७.८ आणि ८.० अंश सेल्सिअस किमान तापमान होते. गोंदिया (८.० अंश सेल्सिअस), वर्धा (९.० अंश सेल्सिअस) ब्रह्मपुरी (१०.० अंश सेल्सिअस) या भागातही तापमानात मोठी घट आहे. मध्य महाराष्ट्रात जळगाव येथे नीचांकी ८.७ अंश किमान तापमानाची नोंद झाली. पुणे, नगर, नाशिक आदी भागातील किमान तापमान ११ अंशांच्या जवळपास होते. मराठवाड्यातील औरंगाबादमध्ये १०.६ अंश तापमानाची नोंद झाली. उस्मानाबाद, परभणी आदी भागांत किमान तापमानाचा पारा ११ अंशांच्या जवळपास होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button