१२ वर्षीय शाळकरी मुलाचा वाईतील धोम डाव्या कालव्यातील पाण्यात बुडुन मृत्यू
घटना स्थळा पासुन अवघ्या १०० मिटर अंतरावर अथर्वचा मृतदेह सापडला.

वाई: वाई तालुक्यातील धोम धरणाचा डावा कालवा हा खानापुर गावा शेजारून जातो या कालव्यातून वाहत असलेले पाणी पाहण्यासाठी याच गावातील अथर्व माने वय १२ वर्ष आणी अर्णव माने वय १० वर्ष असे दोघेजण गेले होते . पायातील चपला काढून या दोघांनी. कालव्याच्या कडेला ठेवून पाण्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असतानाच अथर्व हा पाय घसरून पडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. तर दुसरा अर्णव हा घाबरून पळून गेला की पाण्यात बुडाला याचा सध्या तरी अंदाज पोलिसांना लागत नसल्याने त्याची भुईंज पोलिस ठाण्यात मिसींग दाखल करण्यात आली आहे.
हेही वाचा : ‘सुरेश धस, धनंजय मुंडे आणि कराड एकच’; संजय राऊतांचा गंभीर आरोप
हि घटना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली याची माहिती भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनी रमेश गर्जे यांना समजताच त्यांनी या विभागाचे बिट अंमलदार सहाय्यक फौजदार वैभव टकले यांना सोबत घेऊन घटना स्थळावर पोहचुन ग्रामस्थांच्या मदतीने शोध मोहिम सुरू केली असता घटना स्थळा पासुन अवघ्या १०० मिटर अंतरावर अथर्वचा मृतदेह सापडला.