वंजारी आरक्षणाला विरोध, धनंजय मुंडेंचा जरांगेंना इशारा
बंजारा समाजानंतर वंजारी समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण
मुंबई : मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सोपी व्हावी, यासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केलं. मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या उपोषणाचं फलीत म्हणून सरकारने २ सप्टेंबर २०२५ रोजी शासन निर्णय काढला होता.
ओबीसी समाजातल्या काही घटकांकडून सुरुवातीला या गॅझेटला कडाडून विरोध झाला होता. मात्र गॅझेटमध्ये असलेल्या वेगवेगळ्या नोंदी बघून विरोध मावळला अन् आरक्षणाची नवीन मागणी पुढे येऊ लागली. हैदराबाद गॅझेटमध्ये वंजारी समाजाचा उल्लेख एसटी प्रवर्गात असल्याचा दावा केला जात आहे.
हेही वाचा : “शरद पवारांचे मानस पुत्र विजय कोलते यांनी अहिल्यांच्या जागा लाटल्या”; प्रा. लक्ष्मण हाके
हीच मागणी घेऊन अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पाथर्डी येथे वंजारी समाजबांधवांनी उपोषण सुरु केलं होतं. प्रशासनाच्या मदतीने आणि पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे. उपोषणकर्त्यांशी धनंजय मुंडे यांनी भ्रमणध्वनीवरुन संवाद साधला. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला. कारण यापूर्वी जरांगे पाटलांनी वंजारी समाज बंजारा समाजाचं आरक्षण खातो, असा आरोप केला होता.




