Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

‘एसटी’ च्या ‘NCMC स्मार्ट कार्ड’ नोंदणीला उस्फूर्त प्रतिसाद: आठवड्यात 1 लाखाचा टप्पा पार

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) डिजिटल सेवांच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल म्हणजे ‘NCMC स्मार्ट कार्ड’ उपक्रम होय. सवलत धारक प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नोंदणीची संख्या आता 1 लाखाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यापर्यंत पोहोचली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ही संख्या केवळ एक आकडा नसून, एसटीच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने झेपावणाऱ्या प्रवासाची ठोस साक्ष आहे.असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले आहे.

केवळ आठवड्याभरात या उपक्रमांतर्गत एकूण 1,00,021 प्रवाशांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. यात ‘महिला सन्मान योजना’ लाभार्थ्यांचा सर्वाधिक सहभाग असून तब्बल 37,927 महिलांनी या आधुनिक सुविधेचा स्वीकार केला आहे. त्याचप्रमाणे ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेअंतर्गत 34,948 ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी करून डिजिटल प्रवासाच्या नव्या पर्वाचे स्वागत केले आहे. तसेच इतर ज्येष्ठ नागरिक 24,927 आणि इतर प्रवासी 2,219 अशा विविध घटकांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला आहे.

हेही वाचा –  देशव्यापी राष्ट्रव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहीमेचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ

एसटी महामंडळाचा हा उपक्रम केवळ तांत्रिक बदल नसून, प्रवाशांच्या प्रवासाला अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक बनविण्याचा दूरदर्शी प्रयत्न आहे. रोख व्यवहारांच्या पारंपरिक चौकटीतून बाहेर पडत, डिजिटल माध्यमांचा स्वीकार करण्यासाठी प्रवासी वर्ग मोठ्या प्रमाणात पुढे येत असल्याचे या नोंदणीच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

1 मार्चपासून NCMC स्मार्ट कार्ड असल्याशिवाय सवलत धारक प्रवाशांना प्रवास करता येणार नाही, अशी अफवा समाज माध्यमांवर पसरली होती. तथापि, जोपर्यंत 80 टक्के सवलत धारक प्रवाशांची स्मार्ट कार्डची नोंदणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य केले जाणार नाही, असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रवाशांनी आपल्या जवळच्या बसस्थानक, आगार अथवा अधिकृत खासगी एजंट कडे स्मार्ट कार्ड नोंदणी करावी , असे आवाहन महामंडळातर्फे केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button