Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा आज निकाल ; कोणाच्या हाती जाणार पालिकांची सत्ता ?, निकालाकडे सर्वांचं लक्ष

Maharashtra Municipal Corporation Election Result : राज्यातील  29 महानगरपालिकांसाठी काल झालेल्या लढतीचा आज  निकाल जाहीर होणार आहे. सकाळी 10 वाजतापासून सर्वत्र मतमोजणीला सुरुवात होणार आहे.. तीन वर्षानंतर पार पडलेल्या या निवडणुकांकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान ,  या निवडणुकीत मुंबई वगळता राज्यातल्या इतर सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना आहे. बहुतांश प्रभाग हे 4 सदस्यीय असून काही प्रभाग 3 किंवा 5 सदस्यीय आहे.

हेही वाचा –  आजपासून सेवकांची सद्दी, २९ महापालिकांसाठी राज्यात सरासरी ६० टक्के मतदान

राज्यातील 29 महापालिकांमध्ये सर्वपक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्यानंतर काल  मतदारराजाने त्याचा कौल  ‘ईव्हीएम’ बंद केला. कोणत्या राजकीय पक्षांना आणि नेत्यांना मतदारराजाने संधी दिली आणि कोणाला धक्का दिलाय याचा फैसला आज  सकाळी 10 पासून सुरू होणाऱ्या मतमोजणीद्वारे होणार आहे. मुंबईच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. एकत्र आलेले ठाकरे बंधू महापालिकेवर सत्ता गाजवणार कि भाजप-शिंदेसेना त्यांना धक्का देणार याची उत्सुकता राज्यातच नाही तर संपूर्ण देशात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button