महाराष्ट्र

जावळीच्या राजकारणात शिवेंद्रसिंहराजेच ठरले ‘धुरंधर’;

3-3 च्या बरोबरीतही सभापती, उपसभापती दोन्ही पदांवर भाजपचाच झेंडा

कुडाळ : जावळी पंचायत समितीच्या निवडणुकीत 3-3 असे समसमान संख्याबळ असतानाही सभापतीपदी भाजपचे कुडाळ गणातून निव़डून आलेले सैारभ शिंदे तर उपसभापतीपदी भाजपचेच गोरख महाडिक यांची निवड झाली. निवडीच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय घडामोडी घडून सुध्दा शेवटच्या क्षणी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या चानाक्ष रणऩितीमुळे तालुक्याची महत्वाची दोन्हीही पदे भाजपच्याच पदरात पाडून जावळीच्या राजकारणात शिवेंद्रसिंहराजे ‘धुरंधर’ ठरले. केवळ तीन जागा मिळाल्या असतानाही त्य़ातील दोन्ही जागांवर सभापती व उपसभापती पदे मिळवत आपणच राजकारणाचे ‘बाजीगर’ असल्याचे शिवेंद्रराजे यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

हेही वाचा : एलपीजीचा मोठा साठा घेऊन ‘शिवालिक’ जहाज मुंद्रा बंदरात दाखल

जावली तालुका पंचायत समितीच्या आजच्या सभापती निवडीकडे संपूर्ण तालुक्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांनी कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नाही.  भाजपा तीन, शिवसेना दोन, व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष एक असे पक्षीय बलाबल या सभागृहात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी व मित्र पक्षांनी एकत्र येत ही निवडणूक लढवली होती. स्पष्ट बहुमत अभावी जावली पंचायत समितीच्या सभापती पदाची निवड शेवटच्या क्षमापर्यंत अत्यंत रंजक अवस्थेत मध्ये पोहोचली. सभापती, उपसभापती निवडीसाठी विशेष सभा सभागृहामध्ये पिठासन अधिकारी राजश्री मोरे, यांचे अध्यक्षतेखाली सभेचे सदस्य व सभागृहाचे सचिव तथा गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील, तहसिलदार प्रविण मुदगुल, सहायय्क पोलिस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या उपस्थतीतीमध्ये सपन्न झाली. सकाळी ११ नंतर दोन्ही पदसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली. सभापती पदासाठी भाजपकडून सौरभ शिंदे तर शिवसेना व मित्र पक्षाच्या कडून कुसुंबी गणाच्या सदस्या सुनिता दुंदळे यांचा अर्ज दाखल झाला होता. तर उपसभापती पदासाठी भाजपकडून गोरख महाडीक तर सेनेकडून सुनिता दुंदळे असे अर्ज दाखल झाल होते. सुनिता दुंदळे यांनी उपसभापती पदाचा ऊर्ज माघारी घेतल्याने भाजपचे गोरख महाडीक बिनविरोध निवडून आले. सभापती पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये सौरभ शिंदे यांना तीन मते मिळाली, तर राष्ट्रवादीचे सदस्या शिल्पा शिंदे यांनी तटस्थ भूमिका घेतल्याने सुनिता दुंदळे यांना दोन मते मिळाली. या प्रक्रियेमध्ये  भाजपचे सौरभ शिंदे हे एका मताने विजयी झाले. यापूर्वी पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी ची सत्ता होती, त्यावेळी सौरभ शिंदे यांनी उपसभापती  पदाची धुरा यशस्वी सांभाळली होती. गोरख महाडीक पहिल्यांदाच निवडून आले आणि  उपसभापती झाले. भाजपचे अनेक पदाधिकारी तसेच सेनेचे व राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही तडजोडी शेवटपर्यंत चालू होत्या. मात्र काही नेत्यांनी चिठ्ठीवरच सभापतीची निवडणूक झाली पाहीजे अशी भूमिका घेतल्याने अखेर मतदानावर प्रक्रिया पार पडली.

 शिवेंद्रराजेंचा विरोधकांना मास्टर स्ट्रोकच

जावळीच्या राजकीय आखाड्यात नेहमीच एखाद्या ‘ब्लॉकबस्टर’ चित्रपटासारखा थरार पाहायला मिळतो. जावळी पंचायत समितीच्या निवडणुकीत नामदार शिवेंद्रराजे भोसले आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे व शिवसेनेचे अंकुश शिंदे यांच्यात 3 विरुद्ध 2 विरूध्द 1 असा ‘काँटे की टक्कर’ सामना रंगल्याने संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष याकडे लागले होते. मात्र, “हार कर जीतने वाले को बाजीगर कहते है!” या प्रसिद्ध फिल्मी डायलॉगची अगदी तंतोतंत प्रचिती देत, नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अत्यंत चानाक्ष खेळी केली. त्यांनी प्रतिष्ठेच्या सभापती व उपसभापती अशा दोन्हीं पदांवर भाजपाचाच झेंडा फडकवून विरोधकांना एक प्रकारचा मास्टर स्ट्रोकच दिला आहे.

राष्ट्रवादीच्या शिल्पा शिंदेच्या तटस्थ भुमिकेमुळे भाजपला संधी

पंचायत समितीत 3 -3 असे समसमान सदस्य निवडून आल्याने अभूतपूर्व अशी ‘टाय’ची परिस्थिती निर्माण झाली होती.नक्की सभापती कोण होणार, यावरून मोठी धाकधूक होती. मात्र, पडद्यामागे झालेल्या वेगवान राजकीय घडामोडींनंतर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या सुचनेनुसार सदस्या शिल्पा शिंदे यांनी समंजस भूमिका घेत मतदान प्रक्रियेवेळी तटस्थ भुमिका घेत संभाव्य संघर्ष टाळला. व अखेर सभापतीपदाची माळ भाजपाच्या सैारभ शिंदे यांच्या गळ्यात पडली, एैन निवडीप्रसंगी शशिकांत शिंदे यांनी कोणत्या मुद्द्यावर तडजोड केली हे गुलदस्त्यात असून त्यांच्या भविष्यातील राजकीय भुमिकेविषयीच्या चर्चेना यानिमित्त्ने उत आला आहे.

 

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button