क्रिकेटर स्मृती मंधाना आणि गायक पलाश मुच्छल यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल
तिच्या हातात बॅट अन् त्याच्या हातात गिटार
मुंबई : काही दिवसांपूर्वीच भारतीय महिला क्रिकेट संघाने महिला विश्वकप जिंकला. अजूनही त्यांचं कौतुक होताय. भारतीय महिला संघाची उपकप्तान आणि स्टार बॅट्समन स्मृती मंधाना लवकरच लग्न करणार आहे. येत्या 20 नोव्हेंबरला सांगलीमध्ये तिचं लग्न होणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यातच तिच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
स्मृती आणि गायक , संगीतकार पलाश मुच्छल गेल्या बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. वर्ल्डकप नंतर लगेच त्यांचं लग्न होणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यातच त्यांच्या लग्नपत्रिकेचे फोटो व्हायरल झाले आहेत.
हेही वाचा : ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाची 15 एकर शासकीय जमीन बिनबोभाट लाटली!
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये स्मृती आणि पलाशचा कार्टूनस्टाईल फोटो दिसतोय. ज्यात स्मृतीच्या हातात बॅट आहे तर पलाशच्या हातात गिटार आहे. बॅकग्राउंडला स्टेडियम आहे. तर पत्रिकेवर लाल आणि हिरव्या रंगाची राजस्थानी पद्धतीचं नक्षीकाम दिसतंय.
येत्या 20 नोव्हेंबरला त्यांचं लग्न होणार असल्याचं म्हटलं जातंय. पण त्याबाबतीत अतिशय गुप्तता राखण्यात आली आहे. मोजके मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडणार आहे. या लग्नाला टीम इंडिया हजेरी लावणार का याचीही अनेक क्रिकेटचाहत्यांना उत्सुकता आहे. गेली अनेक वर्षं स्मृती आणि पलाश रिलेशनशिपमध्ये आहेत. 2019 मध्ये त्यांची पहिल्यांदा भेट झाली. हळूहळू ते एकमेकांच्या प्रेमात पडले. गेली 5 वर्षं ते एकमेकांना डेट करत आहेत.




