ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाजपच्या जिवावर महाराष्ट्रात सरकार आणू, एकट्या कमळाचे सरकार : अमित शाह

स्वामीनारायण मंदिर येथील योगी सभागृहात अमित शाहच्या उपस्थितीत भाजपचा संवाद मेळावा

कोल्हापूर : २०२९ मध्ये केवळ भाजपच्याच जिवावर महाराष्ट्रात सरकार आणू, त्या वेळी एकट्या कमळाचे सरकार असेल, अशी गर्जना केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी केली. त्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. २०२४ मध्ये महायुतीचं सरकार येईल, २०२९ ला अजून वेळ आहे, अशा शब्दात उत्तर देत शिंदेंनी विषय वाढवणं टाळलं. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादरमधील स्वामीनारायण मंदिर येथील योगी सभागृहात अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपचा संवाद मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते.

अमित शाह काय म्हणाले?
लोकसभेत दोन जागा आल्या तेव्हा कुणी पक्ष सोडून गेलं नव्हतं. आताही राज्यात महायुतीचंच सरकार स्थापन होईल. महाराष्ट्राची निवडणूक देशाची दशा आणि दिशा बदलणारी आहे. ६० वर्षात महाराष्ट्रात सलग तीन वेळा एकही पक्ष निवडणूक जिंकलेला नाही. आपण महान भारताच्या रचनेसाठी राजकारणात आलोय, असं अमित शाह म्हणाले.

शिंदे-अजितदादांची प्रतिक्रिया
शाहांच्या दाव्यानंतर महायुतीत खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचं टेन्शन वाढल्याची चर्चा आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

२०२४ मध्ये महाराष्ट्रात महायुती सरकार येईल, २०२९ ला अजून वेळ आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तर महाराष्ट्रात कुणा एका पक्षाचं सरकार येऊच शकत नाही, अमित शाह यांचं वक्तव्य भाजप कार्यकर्त्यांचं मोराल वाढवण्यासाठी आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

अमित शाहांचा कानमंत्र
महायुतीला रोखण्याची ताकद कुठल्याही पक्षात नाही. आपल्या नगरसेवक, आमदार आणि खासदारांच्या विरोधात जनतेत असलेली नाराजी दूर करा. प्रत्येक निवडणूक बूथवर आपल्याला १० कार्यकर्ते हवेत. दसऱ्यापासून प्रचार संपेपर्यंत हे कार्यकर्ते त्यांच्या बूथच्या कक्षेत फिरतील. या कार्यकर्त्यांनी आपली विचारसरणी असलेल्या मतदारांना मतदानासाठी उतरवायचे आहे. प्रत्येक बूथवर किमान २० जणांना भाजपचे सदस्य करा. सदस्य करताना मतं मागू नका. सदस्य झाल्यावर त्यांना आपसूकच मतदानाचं महत्त्व कळेल, अशा शब्दात अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button