Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा!
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. शुभेच्छा देताना मुख्यमंत्र्यांनी म्हटलेले आहे की, आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! यंदाचा सण आनंद, उत्साहासोबतच अधिक जबाबदारीने, काळजीने साजरा करायचा आहे. या आजाराचे संकट टळलेले नाही. त्यामुळे भेटीगाठींऐवजी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा द्या आणि स्वत:सोबत इतरांनाही सुरक्षित ठेवा.





