पुणे : मार्केट यार्डामधील व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

पुणे : बाजाराच्या आवाराबाहेरी व्यापारासाठी देण्यात आलेल्या सेसमुक्तीच्या धर्तीवर बाजार आवारातही सेस रद्द करण्यात यावा आणि ई-नाम कायदा रद्द करावा, या मागणीसाठी पुण्यातील मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी मंगळवारी (ता.27) कडकडीत बंद पाळला.
दरम्यान, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दुपारी साडेतीन वाजता व्यापाऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रित केले आहे.
या बंदमध्ये मार्केड यार्डमधील भुसार, फळे, फुले, कांदा-बटाटा, तरकारी, केळी आणि पान विभागातील व्यापारी सहभागी झाले होते. त्यामुळे हा बंद 100 टक्के यशस्वी झाल्याचा दावा दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी सांगितले.
दरम्यान, राज्य विधिमंडळाने बाजार आराराबाहेरील व्यापार सेसमुक्त करण्याबाबत आणि ई-नाम कायदा लागू करण्याबाबत काल (सोमवारी) निर्णय घेतला आहे. त्यामुळे बेमुदत बंद पाळण्याचा निर्णय राज्य पातळीवर घेण्यात आला आहे. मात्र यामध्ये सहभागी व्हायचे का नाही, याबाबतचा निर्णय अद्याप पुना मर्चंट चेंबरने घेतलेला नाही. याबाबतचा निर्णय चेंबरच्या बैठकीत घेण्यात येणार असल्याचेही ओस्तवाल यांनी यावेळी स्पष्ट केले.