तुळजापुरात बेधुंद कारचालकाचा थरार, सहा भाविकांना ‘चिरडले’

- सहाजण जखमी, तीघेजण गंभीर, सोलापूरात उपचार सुरू
- पोलिसांवर राजकीय दबाव, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
तुळजापूर | महाईन्यूज | प्रतिनिधी
तुळजाभवानी मंदिरासमोर मंद्यधूंद अवस्थेत एका तरुणाने बेदरकारपणे 6 भाविकांच्या अंगावरून गाडी चालवली. या घटनेत सहाजण जखमी झाले आहेत. त्यातील तिघेजण गंभीर असून त्यांना सोलापूर येथे हलविण्यात आले आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी तुळजापूर पोलीस कसोशिने प्रयत्न करीत आहेत. राजकीय दबाव वाढवून स्थानिक नेत्यांकडून अशा बेधूंद अवस्थेत वाहन चालवणा-या व्यक्तीसह अन्य तिघांना अभिय मिळवून दिले जात आहे. हा प्रकार रविवारी (दि. 22) सायंकाळी साडेआठच्या सुमारास घडला.
या घटनेत जखमी झालेल्या भविकांची कसलीच नोंद न करता तुळजापूर शासकीय रुग्णालयात प्रथमिक उपचार करण्यात आले. गंभीर जखमिंना तातडीने सोलापूर याठिकाणी पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. त्या तिघांवर सोलापूर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समजते. हे प्रकरण दडपण्यासाठी तुळजापूर पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. काल रात्री घडलेल्या घटनेनंतर आतापर्यंत पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. कारण, मद्यधूंद अवस्थेत गाडी चालवणारा तरुण चैतन्य शिवाजी गडदे (रा. तुळजापूर) याला वाचविण्यासाठी हा सगळा खटाटोप करण्यात आल्याचे वास्तव आहे.

तुळजापूर शहरातील भवानी रोडवरील बांगडी व्यापारी चैतन्य शिवाजी गडदे याने रविवारी सायंकाळी साडेआठच्या सुमारास मद्य प्राशन करुन भवानी रोडवरील त्याचा मित्र मनोज माडजे (रा. तीर्थ बु) याच्या चारचाकी गाडीची चावी घेऊन भवानी रोडवरील चँनेल गेटजवळून गाडी मंदीराच्या दिशेने वेगात चालवली. गाडीवर नियंत्रण मिळवता न आल्याने देवीच्या दर्शनासाठी आलेल्या 6 भाविकांना गाडीची जोरात धडक बसली. तरीही, गाडीचा वेग कमी होत नव्हता, अखेर शहरातील नागरीकांनी मोठमोठयाने आरडाओरड करून शहाजी महाद्वारासमोर ही गाडी रोखली. नागरिकांनी बेधुंद तरुणाला चांगला चोप दिला. गाडीची तोडफोड केली.
त्या गाडीच्या असंख्य तक्रारी
घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन तरुणाला ताब्यात घेतले. मात्र, त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही. विशेष म्हणजे त्या गाडीची कागदपत्रे, पासिंग झालेल्या नोंदी नसल्याची माहिती समोर आली आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहनचालकासह वाहनमालकावरही गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.





