“चंद्रकांतदादांची अवस्था डोनाल्ड ट्रम्पसारखी झालीये”-सचिन सावंत

कोल्हापूर – “भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची अवस्था डोना़ल्ड ट्रम्प यांच्यासारखी झाली आहे. त्यांना पराभवाची कारणमीमांसा भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा समोर करताना नाकी नऊ आले असतील,” अशी खोचक टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे. “ज्या ठिकाणी बॅलेटवर निवडणुका झाल्या आहेत. तिथेही भाजपचा पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे,” असेही सचिन सावंत कोल्हापुरात माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले.
वाचा :-मराठा क्रांती मोर्चाची आज आझाद मैदानात बैठक, राज्यभरातून येणार कार्यकर्ते
“गुरु गोळवलकरच्या यांच्या पुस्तकाचे जोपर्यंत दहन करत नाहीत तोपर्यंत त्यांना संभाजी महाराजांच नाव घेण्याचा अधिकार नाही. तुमचे आदर्श पुन्हा तपासून पाहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नामांतराबाबत आमची तात्विक भूमिका आहे. तुम्ही वर्षानुवर्षे संभाजी नगरच्या नावाखाली राजकीय पोळ्या भाजत आहात, याला आमचा विरोध आहे,” असेही सचिन सावंत म्हणाले.
“हे तिन्ही पक्षाचं सरकार आहे. हा विषय फक्त निवडणुकीपुरतं समोर आणू नका, इतकंच आमचं म्हणणं आहे. सरकारवर या मुद्याचा काहीही परिणाम होणार नाही. हा विषय औरंगाबादपुरता मर्यादित आहे. त्यामुळे समन्वय समितीत नामांतराबाबतचा निर्णय होईल,” अशी माहिती सचिन सावंत यांनी दिली.