क्रिडाताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

महाराष्ट्र इलेव्हन, खेलो इंडिया सेंटर कोल्हापूर अंतिम लढत

पिंपरी चिंचवड | पुणे- महाराष्ट्र इलेव्हन आणि खेलो इंडिया सेंटर,कोल्हापूर यांनी सफाईदार विजयासह तिसऱ्या एसएनबीपी महिला राज्य-स्तरीय हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.चिखली येथील एसएनबीपी संकुलातील डॉ. दशरथ हॉकी स्टेडियमवर रविवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत खेलो इंडिया दुसऱ्या संघाने यजमान एसएनबीपी अकादमी संघाचे आव्हान 6-0 असे किरकोळीत मोडून काढले. महाराष्ट्र इलेव्हन संघाने नाशिक अॅकॅडमीचा 11-0 असा धुव्वा उडवला.महाराष्ट्र इलेव्हन संघाच्या विजयाने पूजा शेंडगे हिने 1ल्या, 39व्या आणि 40व्या, तर अश्विनी काळेकर हिने 8व्या, 14 व्या आणि 18 व्या मिनिटाला गोल करून शानदार हॅटट्रिक नोंदवली. उत्कर्षा काळे हिने (दुसऱ्या आणि 15 व्या) दोन, तर काजल आटपाटकर (13वे), सुकन्या धारवे (29वे) आणि मनश्री शेडगे (35वे मिनिट) यांनी प्रत्येकी एकेक गोल केला.दुसऱ्या उपांत्य लढतीत कोल्हापूरच्या खेलो इंडिया सेंटर संघाने यजमान एसएनबीपी संघाचे आव्हान संपुष्टात आणताना परिपूर्ण खेळाचे प्रदर्शन केले. त्यांच्याकडून सानिका माने हिने हॅटट्रिक नोंदवताना 9, 37 आणि 40व्या मिनिटाला गोल केले. कृष्णा माने (14वे), समिक्षा शेगुंन्शी (31वे) आणि सावित्री बोर्गल्ली (42वे मिनिट) यांनी गोल करून संघाचे विजयाधिक्य वाढवले.

निकाल –

महाराष्ट्र इलेव्हन 11 (पुजा शेडगे 1ले, 39वे, 40वे, उत्कर्ष काळे 2रे, 15वे, अश्विनी काळेकर 8वे, 14वे, 18वे, काजल आटपाटकर 13वे, सुकन्या धावरे 29वे, मनश्री शेडगे 35वे मिनिट) वि.वि. नाशिक अॅकॅडमी 0
खेलो इंडिया सेंटर, कोल्हापूर 6 (सानिका माने 9वे, 37वे, 40वे, कृष्णा माने 14वे, समिक्षा सेगुन्शी 31वे, सावित्री बोर्गली 42वे मिनिट) वि. वि. एसएनबीपी अॅकॅडमी, पुणे 0
अंतिम फेरी – महाराष्ट्र इलेव्हन वि. खेलो इंडिया, कोल्हापूर (दु. 12 वाजता)

तिसऱ्या क्रमांकासाठी – एसएनबीपी अकॅडमी वि. नाशिक अकॅडमी (दु. 1.30 वा.)

केंद्र – शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button