breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणे

महाराष्ट्र राज्य व्यवसायिक पुरस्कारने महिलांचा सन्मान, खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते वितरण

पुणे । प्रतिनिधी

महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्र आणि व्यवसयात यशस्वीरित्या काम करत असणा-या व्यवसायिक महिलांचा ‘महाराष्ट्र राज्य व्यवसायिक पुरस्कार २०२१’ देऊन सन्मान करण्यात आला.महाराष्ट्र राज्य महिला व्यवसायिक संघठना यांच्या वतीने हे पुरस्कार देण्यात आले. राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण पार पडले.पुण्यातील पत्रकार भवन येथे हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला.
पुरस्काराच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्यसभा खासदार वंदना चव्हाण उपस्थित होत्या. तसेच चंदुकाका सराफ आणि सन्सच्या संचालिका डॉ. संगिता शहा आणि मृणाल वाणी आदी मान्यवर उपस्थित होते. खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘महाराष्ट्र राज्य व्यवसायिक संगटनेच्या वतीने व्यवसायिक महिलांना महाराष्ट्र राज्य व्यवसायिक पुरस्कार देऊन त्यांच्या व्यवसाय आणि कतृत्वाला सलाम केला ही अभिमानास्पद बाब आहे. महिला आज आपल्या विचाराच्या पलिकडच्या क्षेत्रात जाऊन व्यवसाय करीत आहेत. हा व्यवसाय त्या आंतरराष्ट्रिय स्तरावर घेऊन जात आहेत याचं कौतुक करावे तेवढे थोडं आहे. महाराष्ट्र राज्य व्यवसायिक संगटना यांच्या सोबत काम करत त्यांना मदत करत आहेत ही कौतुकाची गोष्ट आहे,’ असे त्या म्हणाल्या.


वंदना चव्हाण यांनी संस्थेसोबत काम करण्याची ईच्छा व्यक्त केली तसेच, लघु उद्योगापासून मोठ्या व्यवसायापर्यंत घेउन जाण्यासाठी सहकार्य करण्याची भावना त्यांनी बोलून दाखवली. चंदुकाका सराफ आणि सन्सच्या संचालिका डॉ. संगिता शहा यांनी व्यवसायिक महिलांना भेटवस्तू देऊन त्यांचे कौतुक केले, आणि संस्थेसाठी काम करण्याची ईच्छा व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्य महिला व्यवसायिक संघटनेच्या अध्यक्षा सौ. तृप्ती धनवटे- रामाने यांनी ‘संस्थेच्या माध्यमातून अनेक कामे सुरू केली आहेत. लघु उद्योग आणि कौशल्य विकास उद्योग याला अधिक मागणी आहे. त्यामुळे उद्योग सुरू करून देणे, शासकिय आणि केंद्रिय आर्थिक योजना उपलब्ध करून देणे तसेच, व्यवसायाचे योग्य मार्गदर्शन करून उत्पादन लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संस्था काम करते. पुरस्कृत केलेल्या महिला त्यांच्या उद्योगात अनुभवी आहेत, त्यामुळे त्यांच्या मदतीने राज्यात, आंतरराष्ट्रिय आणि ग्रामीण स्तरावर विविध उपक्रम राबविले जातात.’

पुरस्कृत व्यवसायिक महिलांची नावे –

राजलक्ष्मी जेधे, सुजाता दहाड, श्वेता उंड्रे, स्नेहल निम्हाण, चैताली बरदीया, श्रद्धा पाटील थोरात, जोत्स्ना कलाटे, मेरी जैसवाल, अपूर्वा गुरवे, श्रद्धा दरडे, सुनिता पाटसकर, प्रिती मोरे, अनिता डफळ, किर्ती मोटे, स्मिता वाकडकर, सिमा खंडाळे, विजया मानमोडे, सिमा हिमाने, विनया तापकिर, श्वेता कापसे ,पूनम सस्ते,नेहा मराठे आणि तृप्ती निबळे. प्रास्ताविक संघटनेच्या अध्यक्षा तृप्ती धनवटे-रामाने यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन सचिव अनिता डफळ आणि संस्थेच्या पदाधिका-यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button