breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयआरोग्यताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

महाराष्ट्र हा गोल्ड ऑर्नामेन्ट मॅन्युफक्चरिंग हब व्हावा : फत्तेचंद रांका

Maharashtra should become a gold ornament manufacturing hub: Fattechand Ranka

महाराष्ट्र हा गोल्ड ऑर्नामेन्ट मॅन्युफक्चरिंग हब व्हावा : फत्तेचंद रांका

गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशनची कार्यशाळा उत्साहात

पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

‘सराफांनी नव्या डिझाईनचे दागिने घडवावेत, फक्त सोनसाखळी, अंगठी, गंठण यामध्ये अडकू नये. नव्या मशीन शिकाव्यात.एकत्र येऊन ‘गोल्ड ऑर्नामेन्ट मॅन्युफॅक्चरिंग हब’ तयार करावे.महाराष्ट्र इतर राज्यांच्या आधी मॅन्युफॅक्चरिंग हब बनावे, यासाठी सामूहिक प्रयत्न करावे,असे आवाहन पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी केले.

गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशन( महाराष्ट्र ) आयोजित पुणे जिल्हा कार्यशाळेत ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. दुर्वाकुर हॉल( टिळक रस्ता ) येथे ही कार्यशाळा शनिवारी,२४ सप्टेंबर रोजी झाली. गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशन ( महाराष्ट्र) चे अध्यक्ष पुरुषोत्तम काळे,कार्याध्यक्ष राजेंद्र दिंडोरकर,खजिनदार दीपक देवरुखकर,उप खजिनदार कालिदास कांदळगावकर, प्रशासकीय सचिव सतीश पितळे,सचिव राजाभाऊ वाईकर,पुणे जिल्हाध्यक्ष दामोदर खरोटे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख नचिकेत भुर्के, पुणे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत चाटोरकर, पुणे शहर प्रमुख सत्यनारायण वर्मा व्यासपीठावर उपस्थित होते.

फत्तेचंद रांका म्हणाले, ‘व्हॅल्युअर्सने आपले ज्ञान अद्ययावत करावे, त्यासाठी वेळ काढावा, काळा प्रमाणे बदलावे. मात्र, मूलभूत ज्ञानाची कास सोडू नये. कायद्याचे ज्ञान ठेवावे.सोने चांदीच्या दागिन्यांचे व्हॅल्युएशन करताना व्हॅल्युअर्सने अनुभवाचा, डोळयांचा कस लावावा, कानसने घासून पाहावे, तीच महत्वाची कसोटी आहे. गोल्ड व्हॅल्युअर्सना दागिने हातात घेतल्यावर मूल्यांकन आणि खरे खोटेपणा समजला पाहिजे, कधीही ओव्हर व्हॅल्युएशन, खोटे व्हॅल्युएशन करुन बँकांना आणि स्वतःला अडचणीत आणू नये. हॉलमार्क विना दागिने सोबत ठेऊ नयेत. स्पर्धेच्या जमान्यात सत्व गमावू नये. प्रशिक्षणावर भर द्यावा.

बनावट सोन्याचे दागिने ओळखण्याचे प्रशिक्षण
गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशनतर्फे पुणे जिल्ह्यातील गोल्ड व्हॅल्युअर्स करीता आयोजित कार्यशाळेत शनिवारी असोसिएशनच्या तज्ञ कोअर कमिटी मेंबर्सनी व्हॅल्युअर्स बांधवांना व्हॅल्युएशन संबंधी सखोल मार्गदर्शन केले. तसेच बनावट सोन्याचे दागिने ओळखण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. अशा प्रकारच्या कार्यशाळा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत घेण्याचे असोसिएशनचे नियोजन आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button