ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोरोना संकटामुळे महाराष्ट्र पोलीसही करणार ‘वर्क फ्रॉम होम’ – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

पिंपरी चिंचवड | राज्यात आणि देशभरात कोरोनाच्या आकडेवारीमध्ये कमालीची वाढ होत आहे. कोरोनाच्या उत्परिवर्तित विषाणू ओमायक्रॉनमुळे ही वाढ होत असून देशात कोरोना साथीची तिसरी लाट आली आहे. कोणत्याही परिस्थितीत फ्रंटवर काम करण्यासाठी पोलीस सज्ज असतात. त्यामुळे अनेक पोलिसांना आपल्या प्राणांचे बलिदान द्यावे लागले आहे. पोलिसांच्या आरोग्याचा विचार करत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिसांना देखील वर्क फ्रॉम करता येणार असल्याचे सांगितले आहे.

“आपण 55 वर्षावरील पोलिसांना घरून काम करण्याचा आदेश दिला आहे. 55 वर्षांवरील पोलिसांनी ड्युटीवर न येता घरून काम करायचं आहे. तसेच पोलिसांसाठी वैद्यकीय व्यवस्था तयार आहे”, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

अनेक पोलिसांना देखील सह्व्याधी आहेत. त्यामुळे कोरोना सारख्या काळात फ्रंटवर काम करणे अशा पोलिसांसाठी धोक्याचे आहे. ‘सेवा परमो धर्म’ हे ब्रीद पाळून काम करत असलेल्या पोलिसांना कोरोना, नैसर्गिक संकट आणि अन्य कोणत्याही परिस्थितीत कर्तव्यात सवलत मिळत नसे. मात्र पोलिसांच्या आरोग्याचा विचार करत गृहमंत्र्यांनी चांगला निर्णय घेतला आहे. 55 वर्षांवरील पोलीस घरून नेमके कसे आणि काय काम करतील याबाबत अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र या निर्णयाचे पोलिसांकडून स्वागत केले जात आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस लक्षणीयरित्या वाढत आहे. नागरिकांनी मुखपट्टी वापरावी, सामाजिक अंतर राखावे तसेच शासनाच्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन शासनाकडून वेळोवेळी केले जात आहे. त्यात ओमायक्रॉन या उत्परिवर्तित विषाणूमुळे कोरोना रुग्णांमध्ये आणखी जास्त वाढ होताना दिसत आहे. आजपर्यंत राज्यातील नऊ हजार 510 पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यातील 123 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. समाजाची सुरक्षा करणारे असुरक्षित होऊ नये, यासाठी गृह विभागाने हा मोठा निर्णय घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button