breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकमुंबई

Maharashtra HSC Result 2020 | काही वेळातच बारावीचा निकाल…

मुंबई | आज (16 जुलै) महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. थोड्याच वेळात बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल हाती येणार आहे. दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर http://mahresult.nic.in/ विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.

यंदा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. परंतु, कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे निकाल जाहीर होण्यास उशिर झाला. मागच्या वर्षी 28 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. मात्र यावर्षी लॉकडाऊनमुळे बारावीचा निकाल उशिरा जाहीर होत आहे.

यावर्षी बारावीच्या परिक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. एकूण 9923 कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती आणि पूर्ण राज्यातील जवळपास 3036 परिक्षा केंद्रांवरुन ही बारावीची परिक्षा घेण्यात आली. यामध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी हे विज्ञान शाखेचे होते. विज्ञान शाखेचे 5 लाख 85 हजार 736, कला शाखेचे 4 लाख 75 हजार 134, तर वाणिज्य शाखेचे 3 लाख 86 हजार 784 विद्यार्थी आहेत. व्यावसायीक अभ्यासक्रामाचे 57 हजार 373 विद्यार्थी आहेत. आता या परीक्षेचा आज निकाल लागणार आहे, त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा संपली आहे.

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणपडताळणी उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत मिळणे आणि पुनर्मूल्यांकनासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत या गोष्टींसाठी विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन अर्ज करावे लागत होते. पण आता या प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. निकाल जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून ही प्रक्रिया सुरु केली जाईल.

बारावीचे विद्यार्थी http://verification.mh-hsc.ac.in या वेबसाईटवरुन अर्ज करु शकतील. या अर्जासाठी लागणारी फी सुद्धा आॅनलाईन भरावी लागेल. 16 जुलैला बारावीचा निकाल जाहीर झाल्यावर 17 जुलैपासून बारावीचे विद्यार्थी या वेबसाईटवरुन अर्ज दाखल करु शकणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button