ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

तरुणाचा महिलेसोबत झालेला वाद मिटवण्यासाठी महाराष्ट्र एल्गार सेनेच्या अध्यक्षाने घेतली दोन लाख 84 हजारांची खंडणी

पिंपरी चिंचवड | एका दुकानदार तरुणाचा एका महिलेसोबत वैयक्तिक वाद झाला. तो वाद मिटवण्यासाठी महाराष्ट्र एल्गार सेनेच्या अध्यक्षाने दुकानदार तरुणाकडून दोन लाख 84 हजार रुपयांची खंडणी घेतली. ही घटना डिसेंबर 2020 ते दोन एप्रिल 2021 या कालावधीत आळंदी येथे घडली.दत्ता लक्ष्मण झिटे (वय 30, रा. गंधर्व नगरी, मोशी) यांनी याबाबत मंगळवारी (दि. 17) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विष्णू सुभाष कु-हाडे (रा. आळंदी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे आळंदी-मरकळ रोडवर रमेश स्वीट होम नावाचे दुकान आहे. फिर्यादी यांचा एका महिलेसोबत वैयक्तिक वाद झाला. दरम्यान फिर्यादी आणि आरोपी महाराष्ट्र एल्गार सेनेच्या अध्यक्ष विष्णू याची ओळख झाली.

फिर्यादी यांनी आरोपीला फिर्यादी आणि महिलेचे भांडण मिटवून देण्याची विनंती केली. ते भांडण मिटविण्यासाठी आरोपीने फिर्यादी यांच्याकडून रोख, गुगल पे, क्रेडिट कार्ड द्वारे एकूण दोन लाख 84 हजार रुपये खंडणी घेऊन मानसिक त्रास दिला. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button