breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

Maharashtra Budget 2021: यंदाच्या अर्थसंकल्पात कोणासाठी किती तरतूद? वाचा एका क्लिकवर

मुंबई – महाविकास आघाडी सरकारने आज त्यांच्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात लॉकडाऊनचा परिणाम असल्याने सर्वच क्षेत्राची दखल घेणं गरजेचं आहे. त्यानुसार आजचा अर्थसंकल्प सादर झाला असल्याचं सरकारपक्षाकडून सांगण्यात येतंय. कोरोना संकटाला लक्षात ठेवून राज्याच्या आरोग्य विभागासाठी 7500 कोटी रुपयांचा प्रकल्प तयार करण्यात आल्याची घोषणा अजित पवार यांनी केली.

वाचा :-तीन लाखांचे कर्ज वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्याला नवीन कर्ज शुन्य टक्के व्याजदराने मिळणार

आरोग्यविभागासाठी साडेसात हजार कोटी रुपयांची तरतुद

“कोरोना महामारीच्या काळात सर्वच क्षेत्रातील आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत आरोग्य संस्थांचे बांधकाम श्रेणीवर्धन करुन जनतेला उत्तम दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने 7500 कोटी रुपयांचा प्रकल्प तयार करण्यात आला असून येत्या चार वर्षात तो प्रकल्पपूर्ण करण्यात येईल. या प्रस्तावात जिल्हा रुग्णालय, मनोरुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र व उप केंद्राचे बांधकाम तसेच तालुका स्तरावरील रुग्णालयांचे श्रेणीवर्धन आणि बांधकाम यांचा समावेश आहे. त्याचबरोबर पोस्ट कोव्हिड उपचारासाठी प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये समुपदेशन विभाग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शेतकऱ्यांच्या २४ कोटींच्या प्रशासकीय कामांना मंजुरी

केंद्राने मंजूर केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे 100 हून अधिक दिवस शेतकरी आंदोलनासाठी बसले आहेत. या शेतकऱ्यांच्या पाठिशी राज्य सरकार भक्कमपणे उभे आहे. शेतकऱ्यांसाठी 24 कोटी रुपये किमतीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. इंदापूर, बारामती तालुक्यातील सुमारे पाच हजार हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ देण्यासाठी तातडीने कोटींची सिंचन योजना राबविण्यात येत आहे.

जलसंपदा विभागात 12951 कोटी रुपयांचा निधी

जलसंपदा विभागात 12951 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. राज्यातील 681 चर्चमध्ये परीक्षा नादुरुस्त असलेल्या जलस्रोतांची विशेष दुरुस्ती मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत करण्यात येत आहे. 916 कामांची दुरुस्ती प्रस्तावित असून त्यावरन 1 हजार 340 कोटी 75 लाख इतका खर्च अपेक्षित आहे.

नैसर्गिक आपत्ती आणि इतर खर्चासाठी १५ कोटी ७८ लाखांची तरतूद

2020 मध्ये कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ पूर्व विदर्भ, विदर्भात निर्माण झालेली पूर परिस्थिती, जून ते ऑक्टोबर या काळात राज्यात झालेली अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांना 5 हजार 1224 कोटी रुपये एवढी मदत करण्यात आली. नैसर्गिक आपत्ती मदत व इतर खर्चासाठी अकरा हजार तीनशे 15 कोटी 78 लाख 65 हजार रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे.

समृद्धी महामार्गाचे काम 44 टक्के पूर्ण

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम 44 टक्के पूर्ण झालं आहे. 720 किलोमीटर लांबीचा महामार्ग खुला करण्यात येणार आहे. त्या मार्गाचा मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी आणि जालना या जिल्ह्याच्या विकासासाठी ‘स्टार प्रवाह’ या उद्देशाने नांदेड ते जालना मार्गाचे सात हजार कोटी रुपयांचे काम हाती घेण्यात येत आहे.

कोकणाच्या विकासाचा मार्ग

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर साडे दहा किलोमीटर लांबीच्या दोन भुयारी मार्गाच्या तसेच दोन किलोमीटर लांबीच्या दोन पूलांचा समावेश असलेल्या 595 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. ते डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय ठरणारा आणि कोकणाच्या विकासाचा मार्ग म्हणून ओळखला जाणारा मार्ग असेल अशी आशा आहे.

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर उपाय

राज्यातून तसेच राज्यातील कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक पुणे शहरात आहे. शहरातील वाहतुकीवरील त्याचा प्रचंड ताण पडतो. त्यामुळे पुण्यावरून चक्राकार मार्गाची उभारणी ही काळाची गरज आहे. त्यासाठी सुमारे 170 किलोमीटर लांबीच्या 26 हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे काम हाती घेण्यात येईल. या मार्गामुळे पुणे शहरातील वाहतुकीच्या कोंडीच्या समस्येवर मात करता येईल.

वाहतूक सेवेसाठी विविध कार्यक्रम

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. त्याचीदेखील अंमलबजावणी सुरु आहे. मुंबई शहरातील वाहतूक सुविधा जागतिक दर्जाचे असावेत. त्यासाठी सप्टेंबर 2019 मध्ये शिवडी न्हावा शेवा प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचा नियोजनही आहे. मुंब्रा बायपास, मुंब्रा जंक्शन, कल्याण फाटा, कल्याण फाटा पुलाची निर्मिती, महामार्गाचे रुंदीकरण तसेच कल्याण फाटा मंडपाचे काम प्रगतीपथावर आहे.

‘महाविकास आघाडी सरकारचं संत तुकाराम महाराजांचा सिद्धांत डोळ्यात ठेवून काम सुरु’

“हा महाराष्ट्र आहे, हा कधी संकटापुढे झुकला नाही. संकटामुळे मागे हटला नाही. इतिहासाची पाने चाळली तर अर्थकारण कमी असताना स्वराज्य उभा करत याच महाराष्ट्रात सोन्याच्या सिंहासनावर माझा राजा विराजमान झाला. त्यांनी रयतेचं राज्य निर्माण केलं. ते केवळ मराठी मुलखातील 18 पगड जाती-जमातीच्या एकतेतून आजही कोरोनाच्या महाभयंकर संकटासमोर उभा देश आहे. अर्थकारण हा सरकारपुढे मोठा प्रश्न आणि आव्हान आहे. हे आव्हान पेलताना आमचं महाविकास आघाडीचं सरकार जोडोनिया धन उत्तम व्यवहारे हा जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा सिद्धांत डोळ्यात ठेवून काम करत आहे”, असं अजित पवार यांनी सांगितलं.

“२०२०-२१ च्या अर्थसंकल्पीय भाषणात मी कोव्हिड आजाराचे गांभीर्य विषद केले होते. या विषाणूच्या प्रसाराला भारतात त्यावेळी नुकतीच सुरुवात झाली होती. पण 15 दिवसात देशात टाळेबंदी करावी लागली. कोरोनामुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीचा, त्यानंतर वर्षभर आपण अनुभव घेतला. आजही आपण लढतो आहोत. या लढाईत सामील झालेल्या कोरोना योद्ध्यांना मी आदरपूर्वक अभिवादन करतो. आजारात बळी पडलेल्या राज्यातील नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करतो. महिला पोलीस कर्मचारी, आशा वर्कर आणि सर्व महिला कोव्हिड वॉरीअरचा आदरपूर्वक उल्लेख करतो”, असं अजित पवार म्हणाले.

पर्यटनासाठी १३६७ कोटींची तरतूद

महाराष्ट्राचे नवे पर्यटन धोरण लवकरच जाहीर करणार आहेत. महाबळेश्वर, पाचगणी, लोणार सरोवराचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. वरळीच्या डेअरीच्या जागेवर पर्यटन केंद्र उभारण्याचे काम लवकरच सुरु होईल. तसेच, पर्यटन विभागासाठी 1 हजार 367 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय. महाराष्ट्र राज्य संग्रहालय उभारणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागासाठी 121 कोटी रुपये राखीव ठेवण्यात आलेत. प्राचीन मंदिरांचे जतन करणार, 8 प्राचीन मंदिरांची निश्चिती करण्यात आली आहे. प्राचीन मंदिरांच्या जतनासाठी यंदा 101 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

कोणत्या विभागासाठी किती तरतूद

धान्य साठवण्यासाठी 280 नवीन गोदामे
अन्न व नागरी पुरवठा विभागास 321 कोटी रुपये मंजूर
गृहविभागासाठी 1700 कोटी रुपयांची तरतूद
गृहनिर्माण विभागासाठी 931 कोटींची तरतूद
समृद्धी महामार्ग

उद्योग विभागासाठी 3500 कोटी रुपये
25 हजार मेगावॅटचे अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प उभारणार
समृद्धी महामार्ग, नाशिक-मुंबई मार्गावर मेगा इलेक्ट्रीक चार्जिंग सेंटर उभारणार
ऊर्जा विभागासाठी 9 हजार कोटी रुपयांची तरतूद
जिजाऊ गृहस्वामिनी योजनेची घोषणा
नगरविकास विभागासाठीच्या महत्त्वाच्या घोषणा

मुंबई पूर्व,पश्चिम द्रुतमार्गालगत सायकलिंग मार्ग उभारणार
मुंबईत सांडपाण्यासाठी 19500 कोटी रुपये
मिठी नदी प्रकल्पासाठी यंदा 400 कोटी रुपये
नगरविकास विभागाला 8420 कोटी रुपये मंजूर
खादी ग्रामोद्योग विभागासाठी 70 कोटी रुपये
मुंबईत रेल्वे रुळांवरील 7 उड्डाणपूल उभारणार

शिवडी-न्हावाशेवा प्रकल्प 2022 ला पूर्ण करणार
वरळी ते शिवडी पूलाचे काम 3 वर्षात पूर्ण करणार
मुंबई, ठाणे, नवी मुंबईत जलमार्गाचा वापर वाढवणार
वसई ते कल्याण जलमार्ग सुरु करणार
कोलशेत, काल्हे, डोंबिवली, मीरा भाईंदरला जेट्टी उभाणार
मुंबईतील 14 मेट्रोलाईनचे 1 लाख 40 हजार कोटी खर्च अपेक्षित
मेट्रो मार्ग 2 अ, 7 चे काम 2021 पर्यंत पूर्ण करणार
मुंबईतील कोस्टल मार्ग 2024 पर्यंत पूर्ण करणार
मुंबईत रेल्वे रुळांवरील 7 उड्डाणपूल उभारणार
बाळासाहेबांच्या स्मारकाच्या खर्चासाठी यंदा 400 कोटी
स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभागासाठी 2533 कोटी

जलजीवन अभियानांतर्गत 84 लाख नळजोडण्या दिल्या
मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत 448 पेयजल योजना
स्वच्छता व पाणीपुरवठा विभागासाठी 2533 कोटी
शालेय शिक्षण, क्रीडा विभागासाठी 2400 कोटी

जिल्हा परिषद शाळांच्या पुनर्बांधणीसाठी 3 हजार कोटी
पुण्यातल्या क्रीडा विद्यापीठात 4 अभ्यासक्रम सुरू, 200 विद्यार्थ्यांना प्रवेश
शालेय शिक्षण, क्रीडा विभागासाठी 2400 कोटी
नेहरु सेंटरला 10 कोटी रुपयांचा निधी
अमरावती विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेला 10 कोटी रुपये
उच्च शिक्षण विभागास 1300 कोटी रुपये
सातारच्या सैनिक शाळेला 300 कोटींचा निधी देण्यात येणार

सातारच्या सैनिक शाळेला येत्या तीन वर्षात 300 कोटींचा निधी देण्यात येणार आहे. त्यापैकी 2021-22 मध्ये 100 कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल.
प्रत्येक जिल्ह्यात राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान पार्क उभारलं जाणार त्यासाठी 300 कोटींची तरतूद
उच्च व तंत्र शिक्षण विभाग
राज्यात कौशल्य विद्यापीठांची स्थापणा करण्यास मंजुर
10,226 कोटी रुपयांची महसुली तूट अपेक्षित

ज्येष्ठ पत्रकारांच्या पेन्शनसाठी 25 कोटीत आणखी 10 कोटींची भर
नागपुरात नव्या प्रशासकीय इमारतीसाठी 250 कोटींचा खर्च
महसूल विभागास 289 कोटी रुपये देणार
सामान्य प्रशासन विभागासाठी 1035 कोटींचा निधी
जिल्हा नियोजन विभागासाठी 11,035 कोटींचा निधी
यंदा 3,47,457 कोटींचा महसूल अपेक्षित होता
महसुली उत्पन्नाचे नवे उद्दिष्ट 2,89,494 कोटी
यंदा 10,226 कोटी रुपयांची महसुली तूट अपेक्षित
राजकोषीय तूट 66641 कोटी असेल
राज्यात कृषीपंप जोडणी धोरण राबवणार, महावितरणला 1500 कोटी रुपये प्रस्तावित

बाजार समित्यांच्या बळकटीसाठी 2 हजार कोटींची योजना
4 वर्षात बाजारसमित्यांसाठी 2 हजार कोटी
कृषी पंप जोडणी धोरण राबवणार
कृषीपंप जोडणीसाठी महावितरणला 1500 कोटी रुपये
विकेल ते पिकेल या धोरणाद्वारे 2100 कोटींची खरेदी
संत्रा उत्पादकांसाठी नाशिक जिल्ह्यात अन्नप्रक्रिया उद्योग उभारणार
500 भाजीपाला रोपवाटिका उभारणार
4 कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी दरवर्षी 200 कोटी देणार
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी सरकार प्रयत्न करणार
31 लाख 23 हजार शेतकऱ्यांना 19 हजार कोटी थेट वर्ग केले
शेतकऱ्यांना सुलभरित्या कर्ज उपलब्ध करुन दिले
42 हजार कोटींचे यंदा पीक कर्ज वाटले
3 लाख रुपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के दराने

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button