breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

महाड, पोलादपूर तालुके अजूनही अंधारात; महावितरणकडून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न

मुंबई |

गेल्या आठवड्यात रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यांना महापुराचा फटका बसला. पूर आणि अतिवृष्टीमुळे या तालुक्यांमध्ये वीज पुरवठा खंडीत झाला होता. महाड आणि पोलादपूर तालुक्यातील वीज पुरवठा अद्यापही सुरू झालेला नाही. १८८ गावातील ६८ हजार ८५६ ग्राहक अजूनही अंधारात आहेत. महावितरणकडून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अतिवृष्टी आणि महापुरामुळे महाड व पोलादपूर तालुक्यातील २६८ गावातील ८१ हजार ९०६ ग्राहकांचा वीज पूरवठा खंडीत झाला होता. पूर ओसरल्यानंतर महावितरण कंपनीकडून वीज पूरवठा सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. राज्यातील विवीध भागातून यासाठी पथके दाखल झाली आहेत.

पुरामुळे महाड तालुक्यातील दोन अतिउच्चदाब वाहिन्यांचे टॉवर कोसळले होते. यामुळे चार सब स्टेशनमध्ये बिघाड झाला असून त्यापैकी दोन दुरूस्त करण्यात आले आहेत. तर नादुरुस्त ४४ फिडरपैकी ४ दुरूस्त करण्यात आले आहेत. ८१० डीटीसमध्ये बिघाड झाला होता, त्यापैकी ५७ दुरूस्त करण्यात आले आहेत. उच्चदाबाचे ८८ खांब पडले होते, त्यातील २० खांब उभारण्यात आले. कमी दाबाचे १८१ खांब पडले त्यापैकी १८ उभे करण्यात आले. १ हजार ३०८ वितरण रोहित्र नादुरूस्त झाले त्यापैकी २६१ दुरूस्त करण्यात आली. आहेत. बंद पडलेल्या ४७१ पाणी पुरवठा योजनांपैकी २९ सुरू करण्यात आल्या आहेत. ८ कोविड हॉस्पिटल व व्हॅक्सिनेशन सेंटरचा वीजपरवठा खंडीत झाला होता. त्यापैकी ३ ठिकाणी वीज पूरवठा सुरू करण्यात आला आहे. तर, बंद पडलेल्या ८३ मोबाईल टॉवरपैकी १९ टॉवर सुरू करण्यात आले आहेत.

दुरुस्तीची कामे सुरू असली तरी अजूनही ११८ गावे अंधारात आहेत. दोन तालुक्यातील १२ हजार ५० ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे तर ६९ हजार ८५६ ग्राहक अंधारत आहेत. दरम्यान रायगड जिल्ह्यासह कोकणातील वीज पुरवठा यंत्रणा तात्काळ पूर्ववत करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी नुकतेच उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत रायगडच्या दौर्‍यावर आले होते. यावेळी त्यांनी पेण, महाड, नागोठणे येथील पूरग्रस्त भागांची आणि महावितरण व महापारेषण यंत्रणेच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

“महावितरण, महापारेषणचे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी जीवाची बाजी लावून अनेक ठिकाणी वीज पुरवठा सुरू केला. वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर वीज खाते करत आहे. नदी पात्रात मगरींचे वास्तव्य असताना देखील आमचे कर्मचारी पाण्यात पोहत वीज खांबावर चढून वीज यंत्रणा पुन्हा उभारणीचे काम करत आहेत. पुरामुळे ज्या गावात सध्या वीज पुरवठा सुरळीत करणे शक्य नाही, त्या गावातील घरांना मोफत सौर दिव्यांचे वितरण करण्यात येणार आहे.”, अशी माहिती यावेळी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button