ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

निगडी परिसरात कमी दाबाने व दूषित पाणीपुरवठा

‘फ’ प्रभाग कार्यालयात मनसेचे धरणे आंदोलन

पिंपरी : यमुनानगर स्किम नंबर ९ व निगडी वसाहतीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कमी दाबाने व दूषित पाणी पुरवठा होत आहे. यासंदर्भात अनेकवेळा तक्रारी करून देखील कोणत्याही प्रकारे दखल घेतली जात नव्हती. यासंदर्भात आज (दि.११) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहरप्रमुख सचिन चिखले पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्याकरिता गेले असता तेथून अधिकाऱ्यांनी पळ काढला. या गोष्टीचा निषेध करण्यासाठी गेल्या ३ तासांपासून सचिन चिखले आणि पदाधिकाऱ्यांनी तेथे धरणे आंदोलन सुरू आहे.

यासंदर्भात माहिती देताना सचिन चिखले म्हणाले की, प्रभाग क्रमांक १३ निगडी यमुनानगर येथे गेले अनेक दिवसापासून यमुनानगर स्किम नंबर ९ व निगडी वसाहत या ठिकाणी गढूळ पाणी पुरवठा होत आहे. संबंधित अधिकारी जिंतिकर व बाविस्कर साहेब त्याच प्रमाणे गिरी मॅडम यांना वेळोवेळी तश्या सूचना देण्यात आल्या होत्या, पत्राव्याहार करण्यात आला होता. परंतु महापालिका अधिकारी व प्रशासन यांच्याकडून या गंभीर गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यात आले. वेळोवेळी तक्रार देऊन सुद्धा नागरिकांना कमी दाबाने व दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याविषयी तक्रारी पुढे येत आहेत. याचा जाब विचारण्यासाठी आज ‘फ’ प्रभागात आlo असता अधिकाऱ्यांनी तेथून पळ काढला. या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करत गेले ३ तास धरणे आंदोलन पाणीपुरवठा ‘फ’ प्रभाग ऑफिस मध्ये करत आहोत.

या आंदोलनात मनोज लांडगे, रोहीत काळभोर, विवेक गवळी आदी कार्यकर्ते उपस्थित आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी पाण्याच्या या समस्या संदर्भात आज कार्यवाही सुरू न केल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल असा इशारा सचिन चिखले यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button