breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘पंढरपूरसारखी लॉटरी एकदाच लागते’

नांदेड |

महाराष्ट्रात पंढरपूरनंतर प्रथमच विधानसभेची पोटनिवडणूक लागली आहे. भाजपने पंढरपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करून महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला होता. त्यानंतर ‘पहेले पंढरपूर अब देगलूर’ असा नारा भाजपकडून दिला जात असताना, पंढरपूरसारखी लॉटरी एकदाच लागते, असे प्रत्युत्तर काँग्रेस नेते व ज्येष्ठ मंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी दिले. कोंडलपूर येथे काँग्रेस उमेदवार जितेश अंतापूरकर यांच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या प्रसंगी ते बोलत होते.

सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अंतापूरकर यांनी शिवसेना-भाजप युतीच्या सुभाष साबणे यांचा सुमारे २३ हजार मतांनी पराभव केला होता. साबणे यांनी आता मूळ पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपकडून उमेदवारी मिळवली असून पोटनिवडणुकीत खरी लढत अंतापूरकर व साबणे यांच्यात होणार हेही स्पष्ट झाले. अंतापूरकर यांचा अर्ज ७ रोजी तर साबणे यांचा ८ तारखेला दाखल करण्यात येणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या सत्ताधारी मित्रपक्षांनी आपला पाठिंबा काँग्रेस उमेदवाराला दिला असला, तरी कोंडलवाडीच्या पहिल्या सभेला मित्रपक्षांच्या प्रमुख स्थानिक नेत्यांनी पाठ फिरवली. दुसऱ्या बाजूला भाजपतही धुसफूस चालली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सोमवारी सायंकाळी नांदेडमध्ये आले होते; पण ज्येष्ठ नेते भास्करराव खतगावकर यांची भेट न घेताच ते मुंबईला रवाना झाले.

  • काँग्रेसकडून जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी

देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने पक्षाचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे पुत्र जितेश यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ कोंडलवाडी येथून करण्यात आला. काँग्रेस पक्षाकडे चार-पाच इच्छुकांनी उमेदवारी मागितली होती; पण जिल्हा काँग्रेसच्या शिफारशीनुसार जितेश अंतापूरकर यांचे नाव सोमवारी रात्री जाहीर केले. त्यानंतर इच्छुकांतील भीमराव क्षीरसागर आणि मंगेश कदम यांनी अंतापूरकर यांच्या उमेदवारीला सहमती दर्शवली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button