breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

धावपट्टीच्या दुरुस्तीसाठी लोहगाव विमानतळ २९ ऑक्टोबरपर्यंत बंद

पुणे – लोहगाव विमानतळ धावपट्टीच्या दुरुस्ती कामासाठी १६ ते २९ ऑक्टोबरदरम्यान पूर्ण बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या काळात येथून एकही विमान उड्डाण होणार नाही, अशी माहिती विमानतळ प्रशासनाने दिली. मात्र याचा फटका या कालावधीत आगाऊ तिकीट घेतलेल्या प्रवाशांना बसला आहे.

लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम सप्टेंबर २०२०पासून हाती घेण्यात आले आहे. या कामाचा महत्त्वाचा टप्पा आजपासून सुरू झाला आहे. तो २९ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या काळात विमानतळाच्या धावपट्टीवर विमानांना उड्डाण करता येणार नाही. परिणामी १५ दिवस हे विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. प्रशासनाने १० दिवस अगोदर ही घोषणा केल्यामुळे प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली आहे. १६ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत अनेक प्रवाशांनी आगाऊ तिकीट बुकिंग केले आहे. त्यांना याचा फटका बसला आहे. या विमानतळावरून दररोज ६३ विमान उड्डाणे होतात. त्यात ९,८०३ प्रवासी पुण्याहून इतर शहरांमध्ये प्रवास करतात. तर या विमानतळावर दररोज ८,५२४ प्रवासी उतरतात. त्यांची यामुळे गैरसोय होणार आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button