breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

लसीकरण पूर्ण झालेल्या इमारतींवर लागणार लोगो, मुंबई महापालिकेचा निर्णय

मुंबई – कोरोना लसीचे दोन्ही  डोस पूर्ण झालेल्या हाऊसिंग सोसायटी, इमारती, कार्यालयांसाठी मुंबई महापालिका लोगो तयार करणार आहे. या इमारतींच्या प्रवेशद्वारावर हे विशिष्ट लोगो लागणार आहेत. त्यामुळे संबंधित इमारतीमधून कोरोना प्रसाराचा धोका कमी असल्याचे इतरांना समजण्यास मदत होणार आहे.

सध्या राज्यात डेल्टा प्लसच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्या नागरिकांनाच मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी आहे. त्यातच आता पालकमंत्री तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एक नवी संकल्पना राबविली आहे. लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्या हाऊसिंग सोसायट्या, इमारती, कार्यालयांसाठी मुंबई महापालिका लोगो तयार करणार आहे. मात्र, संबंधित इमारतीत राहणाऱ्या किंवा काम करणाऱ्या सर्वांचे लसीकरण झालेले असणे गरजेचे आहे. यामुळे इतरांनाही कोरोना लसीकरणासाठी प्रोत्साहन मिळेल, असं मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

आज फक्त ७३ केंद्रावरच लसीकरण –

मर्यादीत लससाठा उपलब्ध असल्याने आज 21 सप्टेंबर या दिवशी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 316 पैकी 73 निवडक महानगरपालिका आणि शासकीय लसीकरण लसीकरण सुरु राहणार आहे. या 73 लसीकरण केंद्रांची यादी मुंबई महानगरपालिकेच्या समाजमाध्यमांवर प्रकाशित करण्यात आली आहे.

उद्यापासून सर्वच केंद्रावर लसीकरण मोहीम –

सोमवारी रात्री उशिरापर्यंत महानगरपालिका प्रशासनाला कोविड लससाठा उपलब्ध झाला असून या साठ्याचे वितरण आज मंगळवारी, 21 सप्टेंबर रोजी दिवसभरात विविध शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांना करण्यात येईल. बुधवारपासून सर्व 316 शासकीय व महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण मोहीम पूर्ववत सुरू होईल. लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेवून मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. मुंबईकर नागरिकांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button